JOIN US
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / T20 World Cup : आयसीसीने जाहीर केली वर्ल्ड कपची बेस्ट XI, भारताचे 3 खेळाडू!

T20 World Cup : आयसीसीने जाहीर केली वर्ल्ड कपची बेस्ट XI, भारताचे 3 खेळाडू!

आयसीसीने टी-20 वर्ल्ड कपच्या सर्वोत्तम टीमची घोषणा केली आहे, यात तीन भारतीय खेळाडूंना स्थान देण्यात आलं आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 13 नोव्हेंबर : टी-20 वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये इंग्लंडने पाकिस्तानचा पराभव केला आहे, याचसोबत इंग्लंडने दुसऱ्यांदा टी-20 वर्ल्ड कप ट्रॉफीवर आपलं नाव कोरलं आहे. याआधी इंग्लंडने 2010 साली टी-20 वर्ल्ड कप जिंकला आहे. टी-20 वर्ल्ड कपच्या फायनलनंतर आयसीसीने या वर्ल्ड कपच्या सर्वोत्तम 11 खेळाडूंच्या टीमची घोषणा केली आहे. आयसीसीच्या टीम ऑफ द टुर्नामेंटमध्ये भारताच्या तीन खेळाडूंचा समावेश करण्यात आला आहे. सूर्यकुमार यादव, विराट कोहली आणि अर्शदीप सिंग हे आयसीसीच्या टीममध्ये आहेत. तर पाकिस्तानचे दोन खेळाडू शादाब खान आणि शाहीन आफ्रिदी यांनादेखील आयसीसीच्या टीममध्ये स्थान मिळालं आहे. पराभवानंतरही पाकिस्तानची टीम मालामाल! टीम इंडियाला मिळाले इतके पैसे वर्ल्ड कप विजेत्या इंग्लंडचे 3 खेळाडू आयसीसीच्या टीममध्ये आहेत, ज्यात जॉस बटलर एलेक्स हेल्स आणि मार्क वूड आहेत. दक्षिण आफ्रिकेचा फास्ट बॉलर एनरिच नॉर्किया, न्यूझीलंडचा ग्लेन फिलिप्स आणि झिम्बाब्वेचा सिकंदर रझा हेदेखील आयसीसीच्या टीममध्ये आहेत. ओपनर म्हणून आयसीसीने जॉस बटलर आणि एलेक्स हेल्स यांना तिसऱ्या क्रमांकावर विराट, चौथ्या क्रमांकावर सूर्याला संधी दिली आहे. पाचव्या क्रमांकावर ग्लेन फिलिप्स, सहाव्या क्रमांकावर सिकंदर रझा, सातव्या क्रमांकावर शादाब खान आहेत. शादाब खान आणि सिकंदर रझा यांची ऑलराऊंडर म्हणून टीममध्ये निवड झाली आहे. या टीममध्ये फास्ट बॉलिंगची जबाबदारी एनरिच नॉर्किया, मार्क वूड, शाहीन शाह आफ्रिदी आणि अर्शदीप सिंग यांच्याकडे आहे. या टीममध्ये ऑस्ट्रेलियाच्या एकाही खेळाडूचा समावेश नाही. टी-20 वर्ल्ड कपची आयसीसी टीम जॉस बटलर, एलेक्स हेल्स, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ग्लेन फिलिप्स, सिकंदर रझा, शादाब खान, एनरिच नॉर्किया, मार्क वूड, शाहीन आफ्रिदी, अर्शदीप सिंग इंग्लंडच्या या 5 गोष्टींमधून टीम इंडिया शिकणार! रोहित कुठे चुकला?

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या