मेलबर्न, 13 नोव्हेंबर : टी-20 वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये इंग्लंडने पाकिस्तानला धूळ चारली आहे. वेस्ट इंडिजनंतर दोन वेळा टी-20 वर्ल्ड कप जिंकणारी इंग्लंड दुसरी टीम ठरली आहे. याआधी 2010 साली इंग्लंडने ऑस्ट्रेलियाला हरवत पहिल्यांदा टी-20 वर्ल्ड कप जिंकला होता. यंदाचा टी-20 वर्ल्ड कप जिंकल्यानंतर इंग्लंडवर पैशांचा पाऊस पडला आहे. आयसीसीने इंग्लंडला 1.6 मिलियन डॉलर म्हणजेच जवळपास 13 कोटी रुपयांचं बक्षिस दिलं आहे. पराभवानंतरही पाकिस्तानची टीम मालामाल झाली आहे. पाकिस्तानला आयसीसीने 8 लाख डॉलर म्हणजेच साडे सहा कोटी रुपये दिले. पाकिस्तानी मुल्यानुसार ही किंमत जवळपास 17.5 कोटी रुपये इतकी होते. करनचा वार, स्टोक्सचा प्रहार! इंग्लंडला वर्ल्ड चॅम्पियन करणारे 5 हिरो सेमी फायनलमध्ये पराभूत झालेल्या दोन्ही टीम भारत आणि न्यूझीलंड यांच्या खात्यात सव्वा तीन कोटी रुपये आले आहेत. सुपर-12 राऊंडमध्ये बाहेर गेलेल्या 8 टीमना 70 हजार डॉलर मिळाले आहेत. सुपर-12 मध्ये मिळवलेल्या प्रत्येक विजयासाठी टीमना 40 हजार डॉलर देण्यात आले. टीम इंडियाने सुपर-12 स्टेजमध्ये 5 पैकी 4 मॅच जिंकल्या, पण सेमी फायनलमध्ये इंग्लंडने भारताचा पराभव केला. त्यामुळे टीम इंडियाला या वर्ल्ड कपमधून एकूण 5 लाख 60 हजार डॉलर म्हणजेच जवळपास 4.51 कोटी रुपये इतकी कमाई झाली. आयसीसीने या टी-20 वर्ल्ड कपच्या पुरस्कारांची आधीच घोषणा केली होती, त्यानुसार विजेत्या टीमला 1.6 मिलियन डॉलर म्हणजेच जवळपास 13 कोटी रुपये, तर उपविजेत्या टीमला या रकमेच्या अर्धी रक्कम मिळणार होती. सेमी फायनलमध्ये हरणाऱ्या टीमला प्रत्येकी 4 लाख डॉलर देण्यात आले, तर सुपर-12 मधून बाहेर झालेल्या 8 टीमना प्रत्येकी 70 हजार डॉलरचं इनाम ठेवण्यात आलं होतं. सुपर-12 च्या प्रत्येक विजयासाठी टीमना 40 हजार डॉलर देण्यात आले. इंग्लंडच्या या 5 गोष्टींमधून टीम इंडिया शिकणार! रोहित कुठे चुकला?
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.