टीम इंडिया
मुंबई, 17 सप्टेंबर**:** 16 ऑक्टोबरपासून ऑस्ट्रेलियात टी 20 वर्ल्ड कप खेळवला जाणार आहे. त्यासाठी जवळपास सगळ्या देशांनी आपापले संघ जाहीर केले आहेत. बीसीसीआयनंही आशिया चषक संपताच सोमवारी वर्ल्ड कपसाठीचा 15 सदस्यीय संघ जाहीर केला. पण भारतीय संघ ऑस्ट्रेलियाला रवाना होण्यापूर्वी निवड समितीनं आणखी एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील 15 सदस्यीय संघासह आणखी चार खेळाडूही ऑस्ट्रेलियाला जाणार आहेत. स्टँड बाय खेळाडूंना ऑस्ट्रेलियाचं तिकीट भारतीय संघाची घोषणा करताना बीसीसीआयनं चार खेळाडूंची स्टँड बाय म्हणून निवड केली होती. स्पर्धेदरम्यान जर एखाद्या खेळाडूला दुखापत झाली तर यापैकी एका खेळाडूला बदली खेळाडूला पाठवण्यात येणार होतं. पण आता बीसीसीआयनं निवडलेल्या चारही खेळाडूंना ऑस्ट्रेलियाला धाडण्याचा निर्णय घेतला आहे. या स्टँड बाय खेळाडूंमध्ये मोहम्मद शमी, श्रेयस अय्यर, रवी बिश्नोई आणि दीपक चहर यांचा समावेश आहे. हेही वाचा - T20 World Cup: टीम इंडियाची वर्ल्ड कप जर्सी… पाहा कधी, किती वाजता होणार खास जर्सीचं लॉन्चिंग? 6 ऑक्टोबरला ऑस्ट्रेलियाकडे प्रयाण ऑस्ट्रेलियातल्या टी20 वर्ल्ड कपसाठी भारतीय संघ 6 ऑक्टोबरला ऑस्ट्रेलियाकडे रवाना होणार आहे. 4 ऑक्टोबरला मायदेशात होणारी दक्षिण आफ्रिकेविरुद्धची मालिका संपेल. त्यानंतर लगेचच टीम इंडिया वर्ल्ड कपसाठी रवाना होईल. 16 ऑक्टोबरपासून वर्ल्ड कप सामन्यांना सुरुवात होईल. तर 23 ऑक्टोबरला भारताचा सलामीचा सामना पाकिस्तानसोबत होणार आहे. मेलबर्न क्रिकेट स्टेडियमवर हा सामना पार पडेल.
वर्ल्ड कपसाठीचा भारतीय संघ रोहित शर्मा (कर्णधार), लोकेश राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, रिषभ पंत, हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, भुवनेश्वर कुमार, युजवेंद्र चहल, जसप्रीत बुमरा, रवीचंद्रन अश्विन , हर्षल पटेल, दीपक हुडा, दिनेश कार्तिक, अर्शदीप सिंग स्टँड बाय खेळाडू - मोहम्मद शमी, श्रेयस अय्यर, रवी बिश्नोई आणि दीपक चहर