जाहिरात
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / T20 World Cup: टीम इंडियाची वर्ल्ड कप जर्सी... पाहा कधी, किती वाजता होणार खास जर्सीचं लॉन्चिंग?

T20 World Cup: टीम इंडियाची वर्ल्ड कप जर्सी... पाहा कधी, किती वाजता होणार खास जर्सीचं लॉन्चिंग?

कशी असणार टीम इंडियाची नवी जर्सी?

कशी असणार टीम इंडियाची नवी जर्सी?

T20 World Cup: यंदाच्या टी20 वर्ल्ड कपसाठी बीसीसीआयनं एक खास जर्सी डिझाईन केली आहे. लवकरच या जर्सीचं लॉन्चिंग होणार आहे.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 17 सप्टेंबर**:** पुढच्या महिन्यात ऑस्ट्रेलियात टी20 विश्वचषकाचा महासंग्राम होणार आहे. त्यासाठी रोहित शर्माची टीम इंडिया सज्ज आहे. या वर्ल्ड कपसाठी 15 सदस्यीय भारतीय संघाची घोषणाही करण्यात आली आहे. ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात हा संघ ऑस्ट्रेलियाला रवाना होईल. दरम्यान यंदाच्या टी20 वर्ल्ड कपसाठी बीसीसीआयनं एक खास जर्सी डिझाईन केली आहे. रविवारी होणार अनावरण वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाच्या खास जर्सीचं अनावरण रविवारी होणार आहे. रविवारी रात्री आठ वाजता बीसीसीआयकडून या जर्सीचं लाँचिंग करण्यात येणार आहे. याआधी बीसीसीआयनं आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन एक व्हिडीओ शेअर करत या जर्सीची झलक दाखवली होती. 5 ऑक्टोबरला ऑस्ट्रेलियाकडे प्रयाण ऑस्ट्रेलियातल्या टी20 वर्ल्ड कपसाठी भारतीय संघ 5 ऑक्टोबरला ऑस्ट्रेलियाकडे रवाना होणार आहे. 16 ऑक्टोबरपासून वर्ल्ड कप सामन्यांना सुरुवात होईल. तर 23 ऑक्टोबरला भारताचा सलामीचा सामना पाकिस्तानसोबत होणार आहे. मेलबर्न क्रिकेट स्टेडियमवर हा सामना पार पडेल. हेही वाचा -  Cricket: विराट कोहलीचा टीममेट करतोय धावांची बरसात, डोमेस्टिक क्रिकेटमध्ये ठोकली लागोपाठ शतकं वर्ल्ड कपसाठीचा भारतीय संघ रोहित शर्मा (कर्णधार), लोकेश राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, रिषभ पंत, हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, भुवनेश्वर कुमार, युजवेंद्र चहल, जसप्रीत बुमरा, रवीचंद्रन अश्विन , हर्षल पटेल, दीपक हुडा, दिनेश कार्तिक, अर्शदीप सिंग स्टँड बाय खेळाडू - मोहम्मद शमी, श्रेयस अय्यर, रवी बिश्नोई आणि दीपक चहर

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात