वर्ल्ड कपमध्ये कोण असणार रोहितचा पार्टनर?
मोहाली, 18 सप्टेंबर**:** रोहित शर्माच्या नेतृत्वात टीम इंडिया 20 सप्टेंबरपासून ऑस्ट्रेलियाविरुद्ध टी 20 मालिका खेळणार आहे. या मालिकेतला पहिला सामना मोहालीत खेळवण्यात येईल. त्यासाठी दोन्ही संघांनी सरावालाही सुरुवात केली आहे. याचदरम्यान आज झालेल्या पत्रकार परिषदेत मात्र टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मानं वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची ओपनिंग कोण करणार यावरुन विचारण्यात आलेल्या एका प्रश्नावर उत्तर दिलं आहे. ओपनिंगसाठी पर्याय उपलब्ध रोहितनं मोहालीतल्या या प्रेस कॉन्फरन्समध्ये म्हटलंय, ‘तुमच्याकडे अनेक पर्याय असणं हे नेहमी चांगलं असतं. वर्ल्ड कपमध्ये खेळताना ही बाब महत्वाची आहे. तुम्हाला वाटतं की कोणताही खेळाडू कोणत्याही नंबरवर फलंदाजी करण्यासाठी तयार असेल. आम्ही जेव्हा बॅटिंग लाईनअपच्या बाबतीत काही प्रयोग करतो तेव्हा त्याचा हा अर्थ होत नाही की संघव्यवस्थापनासमोर काही समस्या आहेत.’ रोहितनं पुढे म्हटलंय की ‘टीममधला प्रत्येक खेळाडू काय करु शकतो याची आम्हाला कल्पना आहे. आमच्याकडे तोही एक पर्याय आहे (विराट कोहली ओपनिंगला) आणि आम्हाला ते माहित आहे. कारण वर्ल्ड कपसाठी आम्ही तिसऱ्या ओपनरच्या दृष्टीनं वेगळा विचार केलेला नाही. आयपीएलमध्ये विराटनं ओपनिंग केलेली आहे. त्याची त्याजागी कामगिरीही चांगली आहे. त्यामुळे विराट हा आमच्याकडे ओपनिंगसाठी चांगला पर्याय आहे.’ हेही वाचा - T20 World Cup: ठरलं… टीम इंडियासोबत वर्ल्ड कपसाठी ‘हे’ खेळाडूही ऑस्ट्रेलियाला जाणार! वर्ल्ड कपमध्ये विराट ओपनिंगला****? रोहितनं वर्ल्ड कपच्या काही सामन्यांमध्ये विराट ओपनिंगला खेळू शकतो असंही म्हटलंय. आशिया कपमध्ये एका सामन्यात त्यानं राहुलसोबत संघाच्या डावाची सुरुवात केली होती. तेव्हा त्यानं शतकही ठोकलं होतं. पण राहुलबाबतही आम्हाला पूर्ण विश्वास आहे. तो एक क्वालिटी प्लेयर आहे आणि टीम इंडियासाठी तो एक महत्वाचा खेळाडू आहे असंही रोहित म्हणाला.
वर्ल्ड कपआधी कांगारुंचा सामना दरम्यान वर्ल्डकपला रवाना होण्यापूर्वी टीम इंडिया ऑस्ट्रेलियासह दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टी20 मालिका खेळणार आहे. 20 सप्टेंबरला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेला मोहालीतून सुरुवात होईल. तर 23 आणि 25 सप्टेंबरला या मालिकेतील उर्वरित सामने नागपूर आणि हैदराबादमध्ये खेळवण्यात येतील.