JOIN US
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / Ricky Ponting : 'तो भीतीदायक क्षण', रुग्णालयातून परतल्यानंतर पाँटिंगने प्रकृतीबद्दल दिली माहिती

Ricky Ponting : 'तो भीतीदायक क्षण', रुग्णालयातून परतल्यानंतर पाँटिंगने प्रकृतीबद्दल दिली माहिती

Ricky Ponting : ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंगला छातीत दुखू लागल्यानं काल रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. 24 तास रुग्णालयात डॉक्टरांच्या देखरेखीखाली राहिल्यानंतर तो पुन्हा कमेंट्रीसाठी परतला आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

पर्थ, 03 डिसेंबर : ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंगला छातीत दुखू लागल्यानं काल रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. 24 तास रुग्णालयात डॉक्टरांच्या देखरेखीखाली राहिल्यानंतर तो पुन्हा कमेंट्रीसाठी परतला आहे. छातीत दुखायला लागल्यानंतर रिकी पाँटिंगला अस्वस्थ वाटू लागले होते. त्यानंतर उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले होते. पाँटिंगने शनिवारी सकाळी पुन्हा कमेंट्री बॉक्समध्ये हजेरी लावली. त्याने चॅनेल ७ वर बोलताना आपल्या प्रकृतीची माहिती दिली. रिकी पाँटिंगने यावेळी त्याचा मित्र आणि संघातील माजी सहकारी जस्टिन लँगर आणि चॅनेल ७ क्रिकेटचे प्रमुख ख्रिस जोन्स यांचे आभार मानले. शुक्रवारी लंचआधी कमेंट्रीवेळी छातीत दुखायला लागल्यानंतर यांनी पाँटिंगला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्याचा निर्णय घेतला होता. हेही वाचा :  बांगलादेश दौऱ्याआधी भारताला धक्का, दुखापतीमुळे शम्मी बाहेर, ‘या’ गोलंदाजाला संधी पाँटिंगने चॅनेल 7 वर बोलताना म्हटलं की, मी बहुतेक काल अनेक लोकांना घाबरवलं होतं आणि माझ्यासाठी तो भीतीदायक क्षण होता. मी कमेंट्रीबॉक्समध्ये बसलो होतो. काही वेळाने माझ्या छातीत दुखू लागलं. मी हे दुखणं वाढण्यापासून आणि यापासून सुटका करून घेण्याचा प्रयत्न होता. जेव्हा मी ऑन एअर होतो तेव्हा मला हा त्रास आणखी होऊ द्यायचा नव्हता.

अस्वस्थ वाटायला लागलं तेव्हा मी कमेंट्री बॉक्सच्या मागे आलो. मला भोवळ आली आणि मी बेंचचा आधार घेतला. याबद्दल मी जस्टिन लँगरला सांगितलं. तो माझ्यासोबत कमेंट्री करत होता. क्रिस जोन्सने माझं ऐकून धावत आला आणि मला तिथून बाहेर काढलं. त्यानंतर पुढच्या 10 ते 15 मिनिटात मी रुग्णालायत होतो. त्यामुळे मला चांगले उपचार वेळेत मिळाले असंही पाँटिंगने सांगितलं. हेही वाचा :  IPL 2023: आयपीएल आणखी रंगतदार होणार, नव्या हंगामात इम्पॅक्ट प्लेअरचा नवा नियम लागू रिकी पाँटिंग म्हणाला की, “आज सकाळपासून मला चांगलं वाटतं आहे. मला खूपच फ्रेश वाटतंय.” ऑस्ट्रेलिया विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्या सामन्यातील तिसऱ्या दिवशी प्रकृती बिघडल्याने रिकी पाँटिंगला रुग्णालयात दाखल केलं होतं. पाँटिंगने सामन्याच्या तिसऱ्या दिवशी कमेंट्री केली नव्हती.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या