जाहिरात
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / IPL 2023: आयपीएल आणखी रंगतदार होणार, नव्या हंगामात इम्पॅक्ट प्लेअरचा नवा नियम लागू

IPL 2023: आयपीएल आणखी रंगतदार होणार, नव्या हंगामात इम्पॅक्ट प्लेअरचा नवा नियम लागू

आयपीएल इम्पॅक्ट प्लेअर नियम

आयपीएल इम्पॅक्ट प्लेअर नियम

फुटबॉल, रग्बी, बास्केटबॉल यांसारख्या खेळात वापरण्यात येणारा नियम आता आयपीएलच्या आगामी हंगामात लागू केला जाणार असल्याची घोषणा बीसीसीआयने केली आहे. यामुळे प्लेइंग इलेव्हनसह आणखी ४ खेळाडुंची नावे द्यावी लागणार आहेत.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 02 डिसेंबर : बीसीसीआय ने आयपीएलयच्या नव्या हंगामासाठी नवा नियम लागू केला आहे. इम्पॅक्ट प्लेअर या नावाने हा नियम ओळखला जाणार आहे. खरंतर हा नियम याआधी फुटबॉल, रग्बी, बास्केटबॉल आणि बेसबॉलमध्ये बघायला मिळाला आहे. मात्र आयपीएल मध्ये पहिल्यांदाच त्याचा वापर होणार आहे. आगामी आयपीएलच्या हंगामात इम्पॅक्ट प्लेअर नियम लागू होणार आहे. ट्विटरवरून आयपीएलने याची माहिती दिली. नुकत्याच संपलेल्या सय्यद मुश्ताक अली टी20 ट्रॉफीमध्ये इम्पॅक्ट प्लेअर नियम लागू होता. आयपीएलच्या गव्हर्निंग काउन्सिलने नियमातील मूळ गोष्टी तशाच ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. हेही वाचा:  कमेंट्री करत असतानाच रिकी पाँटिंगची तब्येत बिघडली, रुग्णालयात दाखल बीसीसीआयने म्हटलं की, इम्पॅक्ट प्रेअल कन्सेप्ट सादर करणार आहोत. यानुसार भाग घेणाऱ्या संघांना टी20 सामन्यावेळी त्यांच्या प्लेइंग इलेव्हनमधील एका सदस्याला बदलण्याची मुभा असणार आहे. नियमानुसार एखाद्या संघाला बदल करणे योग्य वाटत असेल तर सामन्यावेळी त्यांच्या प्लेइंग इलेव्हनमधील एक खेळाडू बदलू शकतो.

जाहिरात

नाणेफेक करताना कर्णधाराला प्लेइंग इलेव्हनसोबत ४ अशा खेळाडूंची नावे द्यावी लागतील ज्यांना ते सामन्यादरम्यान पर्याय म्हणून वापरू शकतील. यापैकी एकाला संघातील खेळाडुचा सब्सटिट्यूट म्हणून संधी देता येईल. हेही वाचा :  दोन कोटी बेस प्राइसच्या खेळाडूत एकही भारतीय नाही, 277मध्ये सर्वाधिक ‘या’ देशाचे इम्पॅक्ट प्लेअर एका डावातील १४ व्या षटकाच्या आधी प्लेइंग इलेव्हनमध्ये कोणत्याही खेळाडुची जागा घेऊ शकतो. कर्णधार, मुख्य प्रशिक्षक आणि संघ व्यवस्थापकांनी इम्पॅक्ट प्लेअरला आणण्याबाबत ऑन फिल्ड अधिकाऱ्यांना किंवा चौथ्या पंचांना कळवावे लागेल.

News18लोकमत
News18लोकमत

एखाद्या संघाची प्रथम फलंदाजी करताना बिकट अवस्था झाल्यास ते इम्पॅक्ट प्लेअर नियमाचा वापर करून एका गोलंदाजाच्या जागी सब्सटिट्यूट खेळाडु म्हणून अतिरिक्त फलंदाजाला संधी देऊ शकतात. तसंच फलंदाजी करताना विकेट न गमावल्यास दुसऱ्या डावात एका फलंदाजाच्या जागी अतिरिक्त गोलंदाज संघात घेऊ शकतात. सब्सटिट्यूट खेळाडू मैदानात एकदा आल्यानंतर मैदानातून बाहेर जाणाऱ्या खेळाडुला पुन्हा संधी मिळत नाही.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात