मुंबई, 03 डिसेंबर : भारत आणि बांगलादेश यांच्यात उद्यापासून एकदिवसीय मालिका सुरू होणार आहे. या मालिकेआधी भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे. भारताचा अनुभवी वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी दुखापतीमुळे या मालिकेत खेळू शकणार नाही. बीसीसीआयने त्याच्या जागी संघात वेगवान गोलंदाज उम्रान मलिक याचा समावेश केला आहे. बीसीसीआयने याची माहिती शनिवारी सकाळी दिली.
बीसीसीआयने पत्रकाद्वारे सांगितले की, बांगलादेशविरुद्ध एकदिवसीय मालिकेआधी मोहम्मद शमीच्या खांद्याला दुखापत झाली होती. सध्या तो एनसीए, बेंगळुरूत बीसीसीआयच्या मेडिकल टीमच्या देखरेखीखाली तो आहे. तीन सामन्यांच्या मालिकेत तो खेळू शकणार नाही.अखिल भारतीय वरिष्ठ निवड समितीने उम्रान मलिकची शमीच्या जागी संघात निवड केली आहे.
हेही वाचा : आयपीएल आणखी रंगतदार होणार, नव्या हंगामात इम्पॅक्ट प्लेअरचा नवा नियम लागू
मोहम्मद शमीच्या आधी भारताचा अष्टपैलू क्रिकेटर रविंद्र जडेजा हासुद्धा मालिकेतून बाहेर पडला आहे. जडेजाची संघात निवड झाली होती पण त्याचं खेळणं तंदुरुस्तीवर अवलंबून होतं. पण फिटनेस नसल्यानं जडेजाला बाहेर पडावं लागलं. त्याच्याशिवाय जसप्रीत बुमराह आणि हार्दिक पांड्यासुद्धा संघात नाहीत. या सर्व वरिष्ठ खेळाडुंच्या अनुपस्थित भारतीय गोलंदाजीची बाजू कमकुवत पडताना दिसतेय.
हेही वाचा : कमेंट्री करत असतानाच रिकी पाँटिंगची तब्येत बिघडली, रुग्णालयात दाखल
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bangladesh, BCCI, Cricket, India, Team india