JOIN US
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / 11 हजार रन करणाऱ्याला टीम इंडियात संधी नाही, मग तू कोण? सर्फराजच्या त्या मुलाखतीवर संघाच्या निवडकर्त्याचं उत्तर

11 हजार रन करणाऱ्याला टीम इंडियात संधी नाही, मग तू कोण? सर्फराजच्या त्या मुलाखतीवर संघाच्या निवडकर्त्याचं उत्तर

गेल्या रणजी ट्रॉफी हंगामात 900 हून अधिक धावा करूनही सर्फराज भारतीय कसोटी संघात स्थान मिळवू शकला नाही. भारतीय संघात निवड न झाल्याने नाराज होत मीडियासमोर आपले मत मांडले होते. परंतु याच भूमिकेमुळे सर्फराजने अडचणीत सापडला आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 20 जानेवारी : भारताचा युवा क्रिकेटर सर्फराज खान याने काही दिवसांपूर्वी ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या दोन कसोटी सामन्यांसाठी भारतीय संघात निवड न झाल्याने नाराज होत  मीडियासमोर आपले मत मांडले होते. परंतु याच भूमिकेमुळे सर्फराजने अडचणीत सापडला आहे. गेल्या रणजी ट्रॉफी हंगामात 900 हून अधिक धावा करूनही सर्फराज भारतीय कसोटी संघात स्थान मिळवू शकला नाही. निराश झालेल्या सर्फराजने प्रसारमाध्यमांशी खुलेपणाने बोलत सांगितले होते की बीसीसीआयचे मुख्य निवडकर्ता चेतन शर्मा यांच्याशी माझे बोलणे झाले होते. गेल्या वर्षीच्या बांगलादेश दौऱ्यासाठी कॉल अप देण्याचे आश्वासन शर्मा यांनी दिल्याचे सर्फराजने उघड केले. यावर आता मुंबईचे माजी कर्णधार आणि सध्याचे निवडकर्ते मिलिंद रेगे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. निवडकर्ते मिलिंद रेगे हे एका वृत्तपत्राच्या मुलाखतीत म्हंटले की, “युवा खेळाडूने सार्वजनिक मंचांवर निराशा व्यक्त करण्याऐवजी धावा करण्यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे. पुढे रेगे म्हणाले, “निषेध करत राहा, पण हास्यास्पद टिप्पण्या केल्याने या प्रकरणाचा काही फायदा होणार नाही. सर्फराजने त्याच्या भारतीय संघातील  निवडीविरुद्ध भाष्य करणे टाळावे. धावा काढणे हे त्याचे काम आहे. त्याने आपल्या फलंदाजीवर लक्ष केंद्रित करायला हवे. हे ही वाचा : शुभमन नव्हे तर महिला क्रिकेटरच्या नावावर आहे सर्वात कमी वयात द्विशतकाचा विश्वविक्रम रेगे म्हणाले, “सर्फराज जबरदस्त फॉर्ममध्ये आहे, यात शंका नाही. पण भारतीय कसोटी संघाच्या फलंदाजी क्रमवारीमध्ये त्याच्यासाठी लागा असली पाहिजे.  तो अतुलनीय आहे, मला वाटते की त्याच्यासाठी जिथे संधी असेल ती त्याला मिळेलच  परंतु आता संघात जागा कुठेय?”. मिलिंद रेगे यांनी सर्फराज खान आणि मुंबईचे प्रशिक्षक अमोल मजुमदार यांची तुलना केली. ते म्हणाले, “भारतीय देशांतर्गत क्रिकेटमधील महान फलंदाजांपैकी एक म्हणून ओळखल्या जाणार्‍या, मजुमदार यांनी प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये 11,000 हून अधिक धावा केल्या. परंतु असे असतानाही त्यांना कधीही राष्ट्रीय स्तरावर कॉल-अप मिळाले नाही”. हे ही वाचा : न्यूझीलंडविरुद्ध सामना जिंकला पण एक चुक टीम इंडियाला पडली महागात; ICC ने केला दंड “सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड, व्हीव्हीएस लक्ष्मण आणि सौरव गांगुली यांच्‍या बरोबरीने मजबूत बॅटिंग लाइनअप तयार करून मजुमदार कधीही भारतीय संघाची कॅप मिळवू शकले नाहीत. सरफराजने अमोलच्या स्थितीकडे लक्ष द्यावे आणि आपला खेळ सुरू ठेवावा. अमोलने खूप धावा केल्या, पण राष्ट्रीय संघात तशी जागा नसल्यामुळे त्याची निवड कधीच झाली नाही”.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या