मुंबई, 20 जानेवारी : भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात बुधवारी 18 जानेवारी रोजी वनडे मालिकेतील पहिला सामना पारपडला. या सामन्यात भारताने न्यूझीलंडला 12 धावांनी मात दिली आणि मालिकेत 1-0 अशी आघाडी मिळवली. हा सामना भारताने जिंकला परंतु या सामन्यात झालेली एक चूक भारतीय संघाकडून झालेली ही चूक महागात पडली. आयसीसीने या चुकीबद्दल भारतीय संघाला दंड ठोठावला आहे. अधिकृत ट्विटर अकाउंटवरून आयसीसीने याची माहिती केली.
🚨 JUST IN: India have been fined for maintaining a slow over-rate in the first #INDvNZ ODI. Details 👇https://t.co/HavBvJADyq
— ICC (@ICC) January 20, 2023
आयसीसीकडून भारतीय संघावर न्यूझीलंड विरुद्ध यांच्यातील पहिल्या वनडे सामन्यामध्ये स्लो ओवर रेट टाकल्याने सामना फीच्या 60 टक्के दंड ठोठवण्यात आला आहे. मॅच रेफरी जवागल श्रीनाथ यांनी याबाबत निर्णय दिला असून टीम इंडियाने निर्धारित वेळेपेक्षा तीन ओव्हर टाकल्या. आयसीसीने ठोठवण्यात आलेला दंड रोहित शर्माने स्वीकारलाय.
हे ही वाचा : शुभमन नव्हे तर महिला क्रिकेटरच्या नावावर आहे सर्वात कमी वयात द्विशतकाचा विश्वविक्रम
आयसीसीच्या नियमांनुसार आंतरराष्ट्रीय वनडे सामन्यात संघाला ओव्हर टाकण्यासाठी निर्धारित वेळ दिला जातो. यावेळेतच संघाला संबंधित ओव्हर टाकायच्या असतात. परंतु संघाने निर्धारित वेळेत ओव्हर पूर्ण न केल्यास संघाला दंड केला जातो. आयसीसी आचारसंहितेच्या कलम 2.22 नुसार खेळाडू तसंच खेळाडू सपोर्ट कर्मचार्यांना प्रत्येक ओव्हरसाठी त्यांच्या मॅच फीच्या 20 टक्के दंड ठोठावला जातो.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Cricket, Cricket news, Icc, New zealand, Rohit sharma, Team india