मुंबई, 20 जानेवारी : बुधवारी भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात खेळवल्या गेलेल्या वनडे मालिकेतील पहिल्या सामन्यात भारतीय युवा क्रिकेटर शुभमन गिल याने दमदार द्विशतक ठोकले. शुभमन गिलच्या द्विशतकामुळे भारताने न्यूझीलंड समोर 350 धावांचे आव्हान ठेवले, परंतु हे आव्हान पूर्ण करता न आल्यामुळे 12 धावांनी भारतीय संघाचा विजय झाला. या विजयासह भारताने मालिकेत 1-0 अशी आघाडी मिळवली. शुभमन त्याच्या दमदार खेळीमुळे द्विशतक करणारा जगातील सर्वात कमी वयाचा फलंदाज ठरला. परंतु क्रिकेटमधील महिला आणि पुरुष या दोन्ही गटाचा विचार केला तर महिला खेळाडू या विक्रमात शुभमन पेक्षा वरचढ ठरली आहे.
शुभमन गिलने न्यूझीलंड विरुद्धच्या सामन्यात 208 धावांची खेळी केली. यासह अवघ्या 23 वर्षी शुभमन द्विशतक करणारा जगातील सर्वात कमी वयाचा पुरुष क्रिकेटपटू ठरला. शुभमने या खेळीसह भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा आणि विकेटकिपर ईशान किशनचा ही रेकॉर्ड मोडला. रोहित शर्माने ऑस्ट्रेलिया विरुद्ध 26 व्या वर्षी द्विशतक ठोकले होते, तर ईशानने न्यूझीलंड विरुद्ध वयाच्या 24 व्या वर्षी द्विशतक ठोकण्याचा विक्रम केला होता. शुभमन हा भारताच्या दिग्गज क्रिकेटपटूंचा हा रेकॉर्ड तोडण्यास यशस्वी झाला असला तरी त्याला महिला क्रिकेटपटूचा रेकॉर्ड तोडता आला नाही.
न्यूझीलंडची क्रिकेटपटू अमेलिया केर हिच्या नावावर क्रिकेट विश्वात सर्वात कमी वयात द्विशतक ठोकण्याचा विक्रम आहे. अमेलिया केरने वयाच्या 17 वर्षी हा पराक्रम केला. न्यूझीलंडच्या केरने 2018 मध्ये आयर्लंडविरुद्ध नाबाद 232 धावांची खेळी केली होती.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Cricket, Cricket news, New zealand, Rohit sharma