JOIN US
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / T20 World Cup: सेमी फायनलसाठी 'हे' नवे नियम लागू, पाऊस आल्यास पाहा कशी होणार विजेत्याची घोषणा

T20 World Cup: सेमी फायनलसाठी 'हे' नवे नियम लागू, पाऊस आल्यास पाहा कशी होणार विजेत्याची घोषणा

T20 World Cup: सुपर 12 फेरीत अनेक संघांचा खेळ पावसानं खराब केल्याचं पाहायला मिळालं. त्याचा फटका यजमान ऑस्ट्रेलियालाही बसला. त्यामुळे आता जर सेमी फायनलमध्येही तसंच झालं तर विजेता कसा ठरणार असा प्रश्न उपस्थित होतोय.

जाहिरात

सेमी फायनल, फायनलमध्ये पाऊस आला तर काय?

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मेलबर्न, 06 नोव्हेंबर: आयसीसी टी20 वर्ल्ड कप आता शेवटच्या टप्प्यात पोहोचला आहे. स्पर्धेच्या सेमी फायनलचं चित्रही स्पष्ट झालं आहे. भारत, पाकिस्तान, न्यूझीलंड आणि इंग्लंड या संघांनी अंतिम चारमध्ये स्थान मिळवलंय. पण सुपर 12 फेरीत अनेक संघांचा खेळ पावसानं खराब केल्याचं पाहायला मिळालं. त्याचा फटका यजमान ऑस्ट्रेलियालाही बसला. त्यामुळे आता जर सेमी फायनलमध्येही तसंच झालं तर विजेता कसा ठरणार असा प्रश्न उपस्थित होतोय. पण त्यासाठी आयसीसीनं आधीच प्रयोजन करुन ठेवलेलं आहे. सेमी फायनलमध्ये पाऊस आला तर… सेमी फायनलचे सामने 9 आणि 10 नोव्हेंबर रोजी होणार आहेत. पहिल्या सेमी फायनलमध्ये न्यूझीलंडचा सामना पाकिस्तानशी तर दुसऱ्या सामन्यात इंग्लंड भारताशी भिडणार आहे. पण सेमी फायनलमध्ये पाऊस पडला तर काय? या एकाच गोष्टीची सर्वांना चिंता आहे. आयसीसीनं सेमी फायनल आणि फायनलसाठी राखीव दिवस ठेवला आहे. याचा अर्थ जर पावसामुळे सामना 9 तारखेला खेळला गेला नाही तर 11 तारखेला पूर्ण होऊ शकतो. आणि राखीव दिवशीही पावसानं सामना होऊ दिला नाही तर गटात अव्वल स्थानी असलेला संघ पुढे जाईल. म्हणजेच टीम इंडियाला याचा फायदा होईल.

फायनलचं काय? आता फायनलमध्ये रिझर्व्ह डेला सामना होऊ शकला नाही तर ट्रॉफी कोणाला मिळणार? तर आयसीसीच्या नियमांनुसार इथेही तोच नियम लागू असेल. अंतिम फेरीत पोहोचणाऱ्या दोन संघांपैकी जो सुपर 12 मध्ये अव्वल असेल तो विजेतेपदावर नाव कोरेल. त्यामुळे दोन्ही ठिकाणी भारतीय संघाला हा नियम फायद्याचा ठरणार आहे. कारण ग्रुप 2 मध्ये 5 पैकी 4 सामने जिंकून टीम इंडिया अव्वल स्थानावर आहे. हेही वाचा -  Ind vs Zim: मेलबर्नवर ‘मुंबईकर’ चमकला, चौफेर फटकेबाजीसह केली मॅजिकल इनिंग; Video सेमी फायनलचे सामने बुधवार, 9 नोव्हेंबर न्यूझीलंड वि. पाकिस्तान, पहिली सेमी फायनल सिडनी क्रिकेट ग्राऊंड, दु. 1.30 वा. गुरुवार, 10 नोव्हेंबर भारत वि. इंग्लंड, दुसरी सेमी फायनल अॅडलेड ओव्हल, दु. 1.30 वा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या