मेलबर्न, 06 नोव्हेंबर: मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर टीम इंडियानं पुन्हा एकदा दमदार बॅटिंग केली. पाकिस्तानविरुद्ध यंदाच्या वर्ल्ड कपच्या सलामीच्या लढतीत टीम इंडियानं मेलबर्नवरच विजयी सुरुवात केली होती. विराट कोहली त्या मॅचचा हीरो ठरला होता. पण आज झिम्बाब्वेविरुद्ध एका मुंबईकर खेळाडूनं ती भूमिका पार पाडली. त्याचबरोबर यंदाच्या वर्षात आंतरराष्ट्रीय टी20 मध्ये हजार धावांचा टप्पाही पार केला. तो मुंबईकर फलंदाज म्हणजे सूर्यकुमार यादव. सूर्या पुन्हा चमकला झिम्बाब्वेविरुद्ध टीम इंडियानं 186 धावांचा डोंगर उभा केला. त्यात रोहित शर्मा (26), राहुल (51) आणि विराट कोहली (26) यांनी आपापलं योगदान दिलं. पण मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर जमलेल्या तब्बल 90 हजार प्रेक्षकांचं मन जिंकलं ते सूर्यकुमार यादवच्या बॅटिंगनं. सूर्यानं झिम्बाब्वेच्या गोलंदाजीचा चांगलाच समाचार घेत चौफेर फटकेबाजी केली. ऑफ साईडच्या बॉलवर डीप स्क्वेअर लेगला मारलेले फटके डोळ्यांचं पारणं फेडणारे ठरले. सूर्यानं अवघ्या 25 बॉलमध्ये नाबाद 61 धावांची खेळी केली. त्यानं आपली ही खेळी 6 फोर आणि 4 सिक्सर्सनी सजवली.
Rush to your 📺 now, the first innings of #INDvZIM is heading towards a dramatic finish! 🥶
— Star Sports (@StarSportsIndia) November 6, 2022
Show that you #BelieveInBlue and enjoy the slog overs from this ICC Men's #T20WorldCup clash, LIVE on Star Sports & Disney+Hotstar#INDvsZIM pic.twitter.com/qZ7vcHfvkd
हेही वाचा - T20 World Cup: 15 साल बाद… टी20 वर्ल्ड कपमध्ये पुन्हा होणार भारत-पाकिस्तान फायनल? सूर्यकुमारच्या हजार धावा यंदाच्या वर्षात सूर्यकुमारची बॅट चांगलीच तळपली. त्यानं अवघ्या 28 इनिंगमध्ये आंतरराष्ट्रीय टी20त एक हजार धावांचा टप्पा पार केला. 2022 मध्ये हजार टी20 धावा करणारा तो पहिलाच फलंदाज ठरला. त्यानं यंदा एक शतक आणि 9 अर्धशतकांसह 1030 धावा केल्या आहेत. वर्ल्ड कपमध्येही सूर्यानं कमाल केली आहे. त्यानं गेल्या 5 सामन्यात 75 च्या सरासरीनं 225 धावा ठोकल्या आहेत. वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्यांच्या यादीत विराटनंतर सध्या सूर्याचा नंबर लागतो. विराटच्या खात्यात सध्या 246 धावा जमा आहेत.

)







