ऑस्ट्रेलियाच्या मार्कस स्टॉयनिसचं वेगवान अर्धशतक
पर्थ, 25 ऑक्टोबर: टी20 वर्ल्ड कपच्या सलामीच्या सामन्यात न्यूझीलंडविरुद्ध कांगारुंच्या पदरी मोठा पराभव पडला. पण सुपर 12 फेरी च्या दुसऱ्या सामन्यात मात्र फिंचच्या ऑस्ट्रेलियानं दणदणीत विजय साजरा केला. आशिया चषक विजेत्या श्रीलंकेला कांगारुंनी 7 विकेट्सनी मात दिली. पण ऑस्ट्रेलियाच्या या विजयात सर्वात जास्त भाव खाऊन गेला तो ऑल राऊंडर मार्कस स्टॉयनिस. आज तर स्टॉयनिसला युवराज सिंगच्या पंक्तीत मानाचं स्थान मिळालं. त्याच्या वेगवान अर्धशतकामुळे ऑस्ट्रेलियाला यंदाच्या टी20 वर्ल्ड कप मध्ये पहिला विजय साजरा करता आला. स्टॉयनिसचं वेगवान अर्धशतक सुपर 12 फेरीच्या दुसऱ्या सामन्यात कांगारुंसमोर आव्हाना होतं ते श्रीलंकेचं. पहिल्याच सामन्यात श्रीलंकेनं आयर्लंडचा 9 विकेट्सनी धुव्वा उडवला होता. पण या सामन्यात मात्र श्रीलंकेला ती कामगिरी पुन्हा करता आली नाही. कांगारुंनी पहिल्यांदा बॅटिंग करणाऱ्या श्रीलंकेला 6 बाद 157 या धावसंख्येवर रोखलं. त्यानंतर विजयी लक्ष्य तब्बल 21 बॉल्स बाकी ठेऊन पार केलं. ऑस्ट्रेलियाच्या इनिंगमध्ये कॅप्टन फिंचनं नाबाद 31 धावांचं योगदान दिलं. तर मॅक्सवेलनं 23 धावा केल्या. पण कांगारुंच्या विजयात मोठा वाटा उचलला तो मार्कस स्टॉयनिसनं. त्यानं अवघ्या 17 बॉलमध्ये आपलं अर्धशतक पूर्ण केलं. तर 18 बॉलमध्ये 4 फोर आणि 6 सिक्ससह नाबाद 59 धावा फटकावल्या. आता आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये ऑस्ट्रेलियाकडून वेगवान अर्धशतक झळकावण्याचा विक्रम स्टॉयनिसच्या नावावर जमा झाला आहे.
हेही वाचा - T20 World Cup: टीम इंडियाचं अभिनंदन केलं पण तरीही सौरव गांगुली ट्रोल! पाहा ‘दादा’कडून काय झाली चूक युवराजच्या पंक्तीत स्टॉयनिसला स्थान टी20 क्रिकेटमध्ये आतापर्यंत सर्वात वेगवान अर्धशतकाचा मान भारचाच्या युवराज सिंगचा आहे. त्यानं 2007 साली पहिल्याच टी20 वर्ल्ड कपमध्ये 12 बॉलमध्येच 50 धावा केल्या होत्या. इंग्लंडविरुद्धच्या त्या सामन्यात युवीनं स्टुअर्ट ब्रॉडच्या एकाच ओव्हरमध्ये 6 सिक्स ठोकण्याचा पराक्रम गाजवला होता. त्यानंतर सर्वात कमी बॉलमध्ये आज स्टयनीसनं अर्धशतक झळकावलं. त्याआधी 2014 च्या टी20 वर्ल्ड कपमध्ये नेदरलँडच्या स्टीफन मायबर्गनंही 17 बॉलमध्ये अर्धशतक झळकावलं होतं.
टी20 वर्ल्ड कपमध्ये फास्टेस्ट 50 युवराज सिंग, भारत - 12 बॉल (2007) वि. इंग्लंड स्टीफन मायबर्ग, नेदरलँड - 17 बॉल (2014) वि. आयर्लंड मार्कस स्टॉयनिस, ऑस्ट्रेलिया - 17 बॉल (2022) वि. श्रीलंका ग्लेन मॅक्सवेल, ऑस्ट्रेलिया - 18 बॉल (2014) वि. पाकिस्तान लोकेश राहुल, भारत - 18 बॉल (2022) वि. स्कॉटलंड