मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /T20 World Cup: टीम इंडियाचं अभिनंदन केलं पण तरीही सौरव गांगुली ट्रोल! पाहा 'दादा'कडून काय झाली चूक

T20 World Cup: टीम इंडियाचं अभिनंदन केलं पण तरीही सौरव गांगुली ट्रोल! पाहा 'दादा'कडून काय झाली चूक

सौरव गांगुली झाला ट्रोल

सौरव गांगुली झाला ट्रोल

T20 World Cup: विराट भारताच्या या विजयाचा सर्वात मोठा हीरो होता. याच कारणामुळे दादा ट्रोलर्सच्या निशाण्यावर आला. कोहलीचे चाहते यामुळे सौरव गांगुलीवर चांगलेच नाराज झाले.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 25 ऑक्टोबर: टीम इंडियानं रविवारी टी20 वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तानचा 4 विकेट्सनी पराभव केला. मेलबर्नमधल्या त्या सामन्यात अखेरच्या बॉलवर भारतीय संघ विजयी ठरला. एक वेळ अशी आली होती की टीम इंडिया हा सामना हरतेय असं दिसत होतं. पण विराट कोहलीनं एका बाजूनं शेवटपर्यंत खिंड लढवली आणि भारतानं हा सामना जिंकला. पाकिस्ताननं दिलेल्या 160 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना टीम इंडियाने 33 धावांत 4 विकेट गमावल्या. पण, विराट कोहलीनं 53 बॉलमध्ये नाबाद 82 धावांची खेळी करुन सामन्याचा निकालच बदलला.  विराटच्या कारकीर्दीत ही सर्वोत्तम खेळींपैकी एक ठरली. त्याचबरोबर ऐन दिवाळीच्या पूर्वसंध्येला विराटनं ही खेळी केली. त्यामुळे भारतीय क्रिकेट रसिकांनाही दिवाळीची विजयी भेट मिळाली. दरम्यान टीम इंडियाच्या विजयानंतर बीसीसीआयचे माजी अध्यक्ष आणि भारतीय संघाचा माजी कर्णधार सौरव गांगुली यांनी टीम इंडियाच्या अभिनंदनासाठी एक ट्विट केलं. पण याच ट्विटवरुन तो आता ट्रोल होत आहे.

दादा का झाला ट्रोल?

सौरव गांगुलीनं टी20 वर्ल्ड कपमधल्या पाकिस्तानविरुद्धच्या विजयानंतर हे ट्विट केलं. या ट्विटमध्ये त्यानं भारतीय संघाचं अभिनंदन केलं. पण त्यात हा सामना ज्यानं जिंकून दिला त्या विराट कोहलीचा कुठेही उल्लेख केला नाही. विराट भारताच्या या विजयाचा सर्वात मोठा हीरो होता. याच कारणामुळे दादा ट्रोलर्सच्या निशाण्यावर आला. कोहलीचे चाहते यामुळे सौरव गांगुलीवर चांगलेच नाराज झाले. त्यांनी या ट्विटवर संतप्त प्रतिक्रिया दिल्या आणि त्यांनी गांगुलीला ट्रोल करण्यास सुरुवात केली.

हेही वाचा - T20 World Cup: टीम इंडियाचा सेमी फायनलचा रस्ता साफ, भारतीय संघाला करावं लागणार फक्त 'हे' काम...

ट्विट करुन फसला गांगुली

या ट्विटमध्ये गांगुलीने बीसीसीआयला टॅग केलं. पण, विराट कोहलीला त्यानं ना टॅग केलं ना त्याचा कुठेही उल्लेख केला. झालं... कोहलीच्या चाहत्यांनी ट्विटरवर गांगुलीला बरंच काही सुनावलं.

एका यूजरने गांगुलीसाठी लिहिलंय की, 'दादाला बीसीसीआयमधून काढून टाकल्याबद्दल धन्यवाद.'

एकानं म्हटलंय की 'तुम्ही गेलात, पण राजा परत आला आहे.' दादाच्या या ट्विटवर अशा प्रकारचे खोचक कमेंट्स आल्या.

First published:

Tags: Saurav ganguli, Sports, T20 world cup 2022, Team india, Virat kohli