JOIN US
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / IPL 2023 : लिलावासाठी प्लेअर्सची यादी जारी; 1 कोटी बेस प्राइज असणारे दोनच भारतीय खेळाडू

IPL 2023 : लिलावासाठी प्लेअर्सची यादी जारी; 1 कोटी बेस प्राइज असणारे दोनच भारतीय खेळाडू

आय़पीएल 2023 च्या लिलावासाठी 2 कोटी रुपयांच्या बेस प्राइजमध्ये परदेशी खेळाडुंनी नावे दिली आहेत. तर 11 खेळाडुंनी दीड कोटी रुपये बेस प्राइज दिलीय.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 13 डिसेंबर : इंडियन प्रीमीयर लीगच्या 2023 च्या हंगामासाठी खेळाडुंच्या लिलावाची यादी समोर आली आहे. 23 डिसेंबर 2022 मध्ये कोच्चीत होणाऱ्या लिलावासाठी  405 क्रिकेटपटूंची नावे निश्चित करण्यात आली आहेत. या खेळाडुंवर बोली लागणार आहे. सुरुवातीला 91 खेळाडुंना प्राथमिक यादीत स्थान दिले होते. यात 10 संघांकडून एकूण 369 खेळाडूंना निवडण्यात आले होते. आयपीएलच्या वेगवेगळ्या संघांनी 36 अतिरिक्त खेळाडुंसाठी विनंती केली होती. त्यामुळे ही यादी 405 वर पोहोचली. 405 खेळाडुंमध्ये 273 भारतीय खेळाडु आहेत तर 132 खेळाडु परदेशी आहेत. याशिवाय 4 क्रिकेटपटू हे असोसिएट नेशन्समधील आहेत. लिलावासाठी निवडण्यात आलेल्या खेळाडुंमध्ये 119 कॅप्ड प्लेअर आहेत तर 282 क्रिकेटपटू हे अनकॅप्ड आहेत. हेही वाचा :  फिफा प्रत्येक संघाला देते 73 कोटी, वर्ल्ड कप विजेत्यांना मिळणारी रक्कम माहितीय का? आयपीएलच्या 10 संघांकडे फक्त 87 स्लॉट आहेत. यात 30 परदेशी खेळाडु निवडता येऊ शकतात. 2 कोटी रुपयांच्या बेस प्राइजमध्ये परदेशी खेळाडुंनी नावे दिली आहेत. तर 11 खेळाडुंनी दीड कोटी रुपये बेस प्राइज दिलीय. भारताचे मनीष पांडे आणि मयंक अग्रवाल हे दोनच असे खेळाडु आहेत ज्यांची बेस प्राइज 1 कोटी रुपये इतकी आहे. त्यांच्याशिवाय 18 परेदशी खेळाडुंची बेस प्राइज एक कोटी रुपये आहे. हेही वाचा :  भारताविरुद्ध पहिल्या टेस्टआधी बांगलादेशला धक्का, कॅप्टनला नेलं रुग्णालयात लिलाव 23 डिसेंबरला दुपारी अडीच वाजता सुरू होईल. सनरायजर्स हैदराबादकडे सर्वाधिक पैसे असणार आहेत. त्यांच्या खात्यात 42.25 कोटी रुपये आहेत. तर सर्वात कमी रक्कम कोलकाता नाइट रायडर्सकडे आहे. त्यांच्याकडे फक्त 7 कोटी 5 लाख रुपये आहेत. केकेआरचे 11 स्लॉट रिकामे आहेत. याशिवाय एसआरएच 13 खेळाडु खरेदी करू शकते.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या