जाहिरात
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / भारताविरुद्ध पहिल्या टेस्टआधी बांगलादेशला धक्का, कॅप्टनला नेलं रुग्णालयात

भारताविरुद्ध पहिल्या टेस्टआधी बांगलादेशला धक्का, कॅप्टनला नेलं रुग्णालयात

भारताविरुद्ध पहिल्या टेस्टआधी बांगलादेशला धक्का, कॅप्टनला नेलं रुग्णालयात

भारता आणि बांगलादेश यांच्यातील कसोटी मालिकेला उद्यापासून सुरुवात होणार आहे. दरम्यान, सरावासाठी बांगलादेशचा कॅप्टन शाकिब अल हसन मैदानावर पोहोचला होता. तिथूनच त्याला रुग्णालयात न्यावं लागलं.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 13 डिसेंबर : भारत आणि बांगलादेश यांच्यातील पहिला कसोटी सामना 14 डिसेंबरपासून सुरू होणार आहे. कसोटी सामन्याआधी बांगलादेशच्या अडचणी वाढताना दिसत आहेत. कर्णधार शाकिब अल हसनला सराव सत्रावेळी काही त्रास जाणवू लागला. यामुळे त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. बांगलादेश क्रिकेट बोर्डाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, सरावासाठी शाकिब अल हसन मैदानावर पोहोचला होता. तिथूनच त्याला रुग्णालयात न्यावं लागलं. तिथे इतर कोणतं वाहन नव्हतं. त्यामुळे रुग्णवाहिकेतून त्याला रुग्णालयात दाखल केलं. शाकिब अल हसनची प्रकृती गंभीर नाहीय. त्याला थोडा त्रास जाणवू लागल्याने चेकअपसाठी रुग्णालयात गेला होता. हेही वाचा :  फिफा सेमीफायनलचे सामने कुठे पाहायचे? महागड्या सब्सक्रिप्शनशिवाय लुटा आनंद शाकिब अर्ध्या तासानंतर मैदानावर परतला आणि त्याने काही वेळातच नेटमध्ये फलंदाजीही केली. बांगलादेशच्या प्रशिक्षकांनी सांगितले की, अजून हे स्पष्ट नाही की शाकिब भारताविरुद्ध पहिल्या कसोटीत खेळणार की नाही. आम्ही सध्या तो किती तंदुरुस्त आहे ते पाहत असून त्यावर लक्ष ठेवून आहे. अद्याप थोडी अडचण आहे. उद्याचा सामना खेळेल की नाही यावर लवकरच निर्णय घेतला जाईल. हेही वाचा :  फुटबॉलचा 200 वर्ष जुना खजिना नागपुरात! पाहा Video वेगवान गोलंदाज टस्किन अहमद पहिल्या कसोटीत खेळणार नाही. आम्ही टस्किनला जोखीम पत्करू देणार नाही असं प्रशिक्षकांनी सांगितलं. टस्किनला दोन एकदिवसीय सामन्यात बाहेर बसावं लागलं होतं. त्याच्यासाठी पाच दिवस सामना खेळणं कठीण होऊ शकतं. खेळपट्टी पाहता त्याला जास्त वेळ गोलंदाजी करावी लागू शकते. त्यासाठी टस्किन पुर्णपणे तंदुरुस्त नसल्याने आम्ही त्याला न खेळवण्याचा निर्णय घेतला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात