IPL Auction 2023 : मिनी लिलावात दोन विक्रम, IPLच्या इतिहासात सॅम करन ठरला सर्वात महागडा

2023 IPL Auction : आयपीएल २०२३ साठी झालेल्या लिलावात दोन विक्रम झाले असून यात सॅम करनला सर्वाधिक १८.५० कोटी रुपयांमध्ये पंजाब किंग्जने खरेदी केलं.

  • News18 Lokmat
  • | December 23, 2022, 21:24 IST |  Mumbai, India
    LAST UPDATED 3 MONTHS AGO

    हाइलाइट्स

    21:19 (IST)

    आयपीएल 2023 साठी लिलाव प्रक्रिया संपली आहे. यामध्ये सर्व फ्रँचाइजींनी एकूण 109 खेळाडूंची खरेदी केली. यात 80 भारतीय तर 29 परदेशी खेळाडूंचा समावेश आहे. 

    20:29 (IST)

    राजस्थानने डोमेस्टिक क्रिकेटमधील अनुभवी मुरुगन अश्विनला 20 लाख रुपयांच्या बेस प्राइजवर संघात घेतलं आहे. तर लखनऊने अफगाणिस्तानचा वेगवान गोलंदाज नवीन उल हकला 50 लाख रुपयांमध्ये विकत घेतलं आहे.

    19:29 (IST)

    टी२० वर्ल्ड कपमध्ये हॅट्ट्रिक घेणाऱ्या जोश लिटिलला गुजरातने चार कोटी 40 लाख रुपयांमध्ये खरेदी केलं आहे. त्याने वर्ल्ड कपवेळी न्यूझीलंडविरुद्ध हॅट्ट्रिक घेतली होती.

    18:30 (IST)

    इंग्लंडचा अष्टपैलू क्रिकेटर सॅम करनला पंजाब किंग्जने विक्रमी किंमत मोजून संघात घेतलं. पंजाबने 18.50 कोटी रुपयांत त्याला खरेदी केलं. आयपीएलच्या इतिहासातला सर्वात महागडा क्रिकेटर सॅम ठरला असला तरी टेक्निकली तो महागडा ठरत नाही. सविस्तर बातमी वाचा

    18:4 (IST)

    मनीष पांडेला दिल्ली कॅपिटल्सने 2.4 कोटी रुपये मोजून संघात घेतलं आहे. त्याची बेस प्राइज 1 कोटी रुपये इतकी होती.

    17:38 (IST)

    शिवम मावीला गुजरात टायटन्सने संघात घेतलं. त्याची बेस प्राइज 40 लाख रुपये इतकी होती. त्याच्यासाठी गुजरात टायटन्सने 6 कोटी रुपये मोजले.

    16:59 (IST)

    टॉम बॉन्टन, कुशन मेंडिस, लिट्टन दास, शाकिब अल हसन, जो रूट यांना खरेदी करण्यासाठी कोणत्याही संघाने बोली लावली नाही. तरतबरेज शम्सी, मुजीब, अॅडम झाम्पा, एडम मिल्ने यांच्यासह सौरभ कुमार, प्रियम गर्ग, हिम्मत सिंग हे खेळाडू अनसोल्ड राहिले. 

    16:47 (IST)

    वेगवान गोलंदाज जयदेव उनादकटला लखनऊ सुपर जायंट्सने बेस प्राइज ५० लाख रुपयांत खरेदी केलं. तर इशांत शर्माला दिल्ली कॅपिटल्सने ५० लाख रुपयात संघात घेतलं. 

    16:45 (IST)

    इंग्लंडचा गोलंदाज रिक टॉपलीला रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरने 1.90 कोटी रुपयांमध्ये खरेदी केलं. 

    16:17 (IST)

    वेस्ट इंडिजचा क्रिकेटपटू निकोलस पूरनला १६ कोटी रुपयांची बोली लागली. त्याला लखनऊ सुपर जायंट्सने विकत घेतलं.

    मुंबई : आयपीएल २०२३ साठी मिनी लिलाव आज कोच्चीमध्ये आयोजित करण्यात आले होते. आयपीएल 2023 साठी लिलाव प्रक्रिया संपली आहे. यामध्ये सर्व फ्रँचाइजींनी एकूण 109 खेळाडूंची खरेदी केली. यात 80 भारतीय तर 29 परदेशी खेळाडूंचा समावेश आहे. आयपीएल २०२३ च्या लिलावात दोन मोठे विक्रम झाले आहेत. सॅम करन सर्वात महागडा खेळाडू ठरला तर यष्टीरक्षक निकोलस पूरनला 16 कोटींना लखनऊने खरेदी केलं. यष्टीरक्षकाला मिळालेली ही सर्वात मोठी किंमत आहे.