JOIN US
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / Ind vs SA: काय झाडी, काय डोंगर, काय स्टेडियम... गुवाहाटीत टीम इंडियाचं रेकॉर्ड एकदम ओके!

Ind vs SA: काय झाडी, काय डोंगर, काय स्टेडियम... गुवाहाटीत टीम इंडियाचं रेकॉर्ड एकदम ओके!

Ind vs SA: भारतीय संघानं गुवाहाटीत आतापर्यंत तीन टी20 सामने खेळले आहेत. त्यापैकी 2017 साली ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात भारताला हार स्वीकारावी लागली होती.

जाहिरात

गुवाहाटी क्रिकेट स्टेडियम

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

गुवाहाटी, 02 ऑक्टोबर: काही दिवसांपूर्वी महाराष्ट्रात सत्तांतर झालं. त्याआधी याच सत्तांतराच्या वेळी काही घडामोडी घडल्या. त्यावेळी महाराष्ट्रातली काही नेतेमंडळी पूर्वेकडच्या आसाममधील गुवाहाटीत पोहोचली आणि तिथूनच मग त्या राजकीय नाट्याची पुढची ठिणगी पडली. याचदरम्यान एका राजकीय नेत्यानं त्यांच्या हॉटेलमधल्या रुममधून दिसणाऱ्या गुवाहाटीच्या निसर्गाचं वर्णन करताना म्हटलं होतं, ‘काय झाडी.. काय डोंगर… काय हॉटेल… सगळं एकदम ओक्के!’ या ओळी सोशल मीडियात तुफान व्हायरल झाल्या. आणि त्या आता आठवण्याचं कारण म्हणजे टीम इंडिया याच गुवाहाटीतल्या बारसपारा स्टेडियममध्ये आज दक्षिण आफ्रिकेविरुद्ध आपला दुसरा टी20 सामना खेळणार आहे. गुवाहाटीत टीम इंडियाचं रेकॉर्डही ओक्केच! भारतीय संघानं गुवाहाटीत आतापर्यंत तीन टी20 सामने खेळले आहेत. त्यापैकी 2017 साली ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात भारताला हार स्वीकारावी लागली होती. तर दुसऱ्या सामन्यात 2018 साली भारतानं वेस्ट इंडिजला 8 विकेट्सनी हरवलं होतं. तर 2020 साली भारत आणि श्रीलंका संघातला सामना पावसामुळे रद्द करण्यात आला होता. दुसरीकडे वन डेत भारतीय संघ गुवाहाटीत आजवर 12 सामने खेळला आहे. पण त्यापैकी दोन सामने रद्द झाले होते. उरलेल्या 10 पैकी सहा सामने भारतानं जिंकले आहेत. तर चार सामन्यात प्रतिस्पर्धी संघानं बाजी मारली होती.

दक्षिण आफ्रिकेचा तो रेकॉर्ड मोडणार? 2015-16 च्या मोसमात दक्षिण आफ्रिकन संघ टी20 मालिका खेळण्यासाठी पहिल्यांदा भारत दौऱ्यावर आला होता. तेव्हा दक्षिण आफ्रिकेन ती मालिका 2-0 अशा फरकानं जिंकली होती. त्यानंतर 2019 आणि 2020 साली दक्षिण आफ्रिका संघ भारत दौऱ्यावर आला होता. पण तेव्हा दक्षिण आफ्रिकेनं टी20 मालिका 1-1 आणि 2-2 अशा बरोबरीत राखल्या होत्या. त्यामुळे मालिका गमावण्याची वेळ त्यांच्यावर आली नाही. पण यंदा दक्षिण आफ्रिकेला मालिका जिंकून न देण्याच्या इराद्यानं टीम इंडिया मैदानात उतरली आहे.

संबंधित बातम्या

हेही वाचा -  बापरे! रोनाल्डो आणि कोहली एका इन्स्टाग्राम पोस्टसाठी घेतात इतके कोटी रुपये… गुवाहाटीत भारतीय संघात बदल? वर्ल्ड कपसाठी ऑस्ट्रेलियाला रवाना होण्यापूर्वी टीम इंडियाकडे आता सरावासाठी दोनच सामने उरले आहेत. त्यामुळे उद्याच्या सामन्यात भारतीय संघात काही बदल केले जाण्याची शक्यता आहे. बुमराऐवजी संघात सामील केलेल्या मोहम्मद सिराजला संधी मिळणार की नाही हे पाहणं महत्वाचं ठरेल. तर बॅटिंग लाईन अपमध्ये श्रेयस अय्यरला संधी मिळणार का? हाही प्रश्न आहे. भारत वि. दक्षिण आफ्रिका, दुसरी टी20 बारसपारा क्रिकेट स्टेडियम, गुवाहाटी 2 ऑक्टोबर, संध्याकाळी 7.00 वाजता स्टार स्पोर्टस, डिस्ने हॉटस्टारवर थेट प्रक्षेपण

जाहिरात

**भारतीय टी20 संघ –**रोहित शर्मा (कर्णधार), लोकेश राहुल (उपकर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, रिषभ पंत (विकेट किपर), दिनेश कार्तिक (विकेट किपर), रवीचंद्रन अश्विन, युजवेंद्र चहल, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग, उमेश यादव, हर्षल पटेल, दीपक चहर, शाहबाज अहमद, मोहम्मद सिराज दक्षिण आफ्रिकेचा टी20 संघ - तेम्बा बवुमा (कर्णधार), क्विंटन डी कॉक, रिझा हँड्रिक्स, हेनरिक क्लासेन, केशव महाराज, एडन मार्करम, डेविड मिलर, लुंगी एनगिडी, एनरिक नॉकिया, वेन पार्नेल, ड्वेन प्रिटोरियस, कगिसो रबाडा, रिले रुसो, तबरेझ शम्सी, ट्रिस्टन स्टब्स, ब्यॉर्न फॉर्च्यून, मार्को यान्सन आणि एंडिल फेहलुकवायो

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या