मॅन्चेस्टर युनायटेडकडून खेळणारा पोर्तुगालचा हा दिग्गज फुटबॉलर सध्या मैदानात तितकासा फॉर्मात नाही. पण सोशल मीडियात रोनाल्डोची चांगलीच चलती आहे. इन्स्टाग्रामवर रोनाल्डोच्या खात्यात तब्बल 40 कोटी फॉलोअर्स आहेत. त्यामुळे रोनाल्डोच्या एका पोस्टसाठी इन्स्टाग्रामकडून त्याला जवळपास 19 कोटी रुपये मिळतात.
सर्वाधिक इन्स्टाग्राम फॉलोअर्सच्या बाबतीत हॉलिवूड अभिनेत्री काईल जेनरचा नंबर लागतो. काईल जेनरचे तब्बल 37 कोटी फॉलोअर्स आहेत. तिलाही इन्स्टाग्रामकडून एका पोस्टसाठी तब्बल 18 कोटी रुपये मिळतात.
या यादीत तिसऱ्या नंबरवर आहे तो फुटबॉल स्टार लायनल मेसी. मेसीचे 36 कोटी फॉलोअर्स आहेत. मेसी एका इन्स्टा पोस्टमधून जवळपास 14 कोटी रुपये कमवतो.
20 कोटीपेक्षा जास्त इन्स्टाग्राम फॉलोअर्स असणाऱ्या सेलिब्रेटिंच्या यादीत विराट कोहली हे एकमेव भारतीय नाव आहे. विराट एका इन्स्टाग्राम पोस्टमधून जवळपास 8 कोटी रुपये कमवतो.
विराट कोहली सध्या क्रिकेटविश्वातील सर्वात लोकप्रिय खेळाडू आहे. इन्स्टाग्रामसह फेसबुक आणि ट्विटरवरही विराटचे 10 कोटीहून अधिक फॉलोअर्स आहेत.