टीम इंडिया
मुंबई, 17 ऑगस्ट**:** आयसीसीनं 2023 ते 2027 या पुढच्या चार वर्षांचं आंतरराष्ट्रीय क्रिकेट कार्यक्रम जाहीर केला आहे. आयसीसीनं एफटीपी मध्ये दिलेल्या माहितीनुसार 12 सदस्य देश चार वर्षात एकूण 777 आंतरराष्ट्रीय सामने खेळणार आहेत. ज्यात 173 कसोटी 281 वन डे आणि 323 टी20 सामन्यांचा समावेश आहे. सध्या व्यावसायिक टी20 लीगच्या वाढत्या प्रभावानंतरही आयसीसीनं आंतरराष्ट्रीय सामन्यांवर भर दिला आहे. 2019 ते 2023 या चार वर्षांच्या तुलनेत मेन्स क्रिकेटमध्ये येत्या चार वर्षात सामन्यांचं प्रमाण जास्त आहे.
दोन वेळा बॉर्डर गावस्कर ट्रॉफी या चार वर्षांमध्ये भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात 2 वेळा बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीचं आयोजन करण्यात आलं आहे. उभय संघांमध्ये होणाऱ्या या मालिकेत आता पाच कसोटी खेळवल्या जाणार आहेत. याआधी गेल्या 30 वर्षात बॉर्डर गावस्कर ट्रॉफीमध्ये 4 कसोटी सामने खेळवले जात होते. 1992 साली दोन्ही संघांमध्ये 5 कसोटी सामन्यांची अखेरची मालिका पार पडली होती. 2023 ते 2027 दरम्यान प्रत्येक वर्षी आयसीसीनं एक खास विंडो ठेवली आहे. त्यानुसार एप्रिल आणि मेदरम्यान कमी आंतरराष्ट्रीय सामने खेळवले जातील. हेही वाचा - Shikhar Dhawan: अशी अॅक्टिंग पाहिलात कधी? ईशान किशन, शुभमन गिलसह धवनचा भन्नाट व्हिडीओ… टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये भारताचे सामने जागतिक कसोटी अजिंक्यपदाच्या 2023 ते 2025 दरम्यान होणाऱ्या मालिकांसाठी न्यूझीलंड, इंग्लंड आणि बांगलादेश हे संघ भारत दौऱ्यावर येतील. तर टीम इंडिया ऑस्ट्रेलिया, वेस्ट इंडिज आणि दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर जाईल. टेस्ट चॅम्पियनशिप 2025 ते 2027 साठी ऑस्ट्रेलिया, वेस्ट इंडिज आणि दक्षिण आफ्रिका हे संघ भारतात येतील. तर इंग्लंड, श्रीलंका आणि न्यूझीलंडमध्ये भारतीय संघ यजमान संघाशी दोन हात करेल.