मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

Shikhar Dhawan: अशी अ‍ॅक्टिंग पाहिलात कधी? ईशान किशन, शुभमन गिलसह धवनचा भन्नाट व्हिडीओ...

Shikhar Dhawan: अशी अ‍ॅक्टिंग पाहिलात कधी? ईशान किशन, शुभमन गिलसह धवनचा भन्नाट व्हिडीओ...

इन्स्टा रिलमध्ये धवन, ईशान आणि शुभमन

इन्स्टा रिलमध्ये धवन, ईशान आणि शुभमन

Shikhar Dhawan: ऑन फिल्ड मजा मस्ती करणारा धवन सोशल मीडियातूनही चाहत्यांचं पूरेपूर मनोरंजन करण्याची एकही संधी सोडत नाही. या व्हिडीओतही धवन, ईशान आणि शुभमननं एका गाण्यावर केलेला हा डान्स केवळ चाहत्यांच्याच नव्हे तर अनेक क्रिकेटर्सच्याही पसंतीस उतरलाय.

पुढे वाचा ...
  • Published by:  Siddhesh Kanase
हरारे, 17 ऑगस्ट: टीम इंडियातील अनेक क्रिकेटर्स सोशल मीडियात चांगलेच अॅक्टिव्ह असतात. या सगळ्यात आघाडीवर आहे तो सलामीवीर आणि वन डे संघाचा उपकर्णधार शिखर धवन. धवन नेहमी सोशल मीडियात काहीतरी नवीन पोस्ट करत असतो. धवनचे इन्स्टाग्रामवर तब्बल 11 मिलियन फॉलोअर्स आहेत. आणि फॉलोअर्सची ही संख्या दिवसेंदिवस वाढताना दिसतेय. झिम्बाब्वे दौऱ्यावर असलेल्या धवननं नुकताच एक व्हिडीओ शेअर केला आहे. आणि त्यात धवनसह ईशान किशन आणि शुभमन गिल देखील आहे. ऑन फिल्ड मजा मस्ती करणारा धवन सोशल मीडियातूनही चाहत्यांचं पूरेपूर मनोरंजन करण्याची एकही संधी सोडत नाही. या व्हिडीओतही धवन, ईशान आणि शुभमननं एका गाण्यावर केलेला हा डान्स केवळ चाहत्यांच्याच नव्हे तर अनेक क्रिकेटर्सच्याही पसंतीस उतरलाय. गायक फरासत अनीसच्या एका व्हायरल गाण्यावर या तिघांनीही केलेली अक्टिंग भन्नाट आहे.
सूर्यकुमार, सिराजनं दिली कमेंट या व्हिडीओला आतापर्यंत साडेचार लाखांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. तर सूर्यकुमार यादव, लोकेश राहुल आणि मोहम्मद सिराज या क्रिकेटर्सनी त्यावर कमेंटही केलीय. श्रेयस अय्यरनही या व्हिडीओची प्रशंसा केली. त्यावर रिप्लाय देताना धवननं श्रेयसची उणीव जाणवत असल्याचं म्हटलंय. कारण झिम्बाब्वे दौऱ्यावर आलेल्या भारतीय संघात श्रेयस अय्यरचा समावेश करण्यात आलेला नाही. दरम्यान काही दिवसांपूर्वी धवनच्या एका व्हिडीओत चक्क टीम इंडियाचे प्रक्षिक्षक राहुल द्रविडही दिसले होते. हेही वाचा - Elon Musk: रोनाल्डोच्या मॅन्चेस्टर युनायटेडवर एलन मस्कची नजर? पाहा मस्कच्या ‘त्या’ ट्विटची का होतेय चर्चा? उद्यापासून वन डे मालिका झिम्बाब्वे दौऱ्यावर असलेला भारतीय संघ उद्या तीन वन डे सामन्यांच्या मालिकेतील आपला पहिला सामना खेळणार आहे. हरारे स्पोर्टवर दुपारी 12.45 वाजता या सामन्याला सुरुवात होईल. तर 20 आणि 22 ऑगस्टला उर्वरित दोन सामने खेळवले जातील. भारतीय संघ – लोकेश राहुल (कर्णधार), शिखर धवन (उपकर्णधार), ऋतुराज गायकवाड, शुभमन गिल, दीपक हुडा, राहुल त्रिपाठी, ईशान किशन, संजू सॅमसन, शाहबाज अहमद, शार्दूल ठाकूर, कुलदीप यादव, अक्षर पटेल, आवेश खान, प्रसिध कृष्णा, मोहम्मद सिराज, दीपक चहर
First published:

Tags: Sports, Team india

पुढील बातम्या