JOIN US
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / IND VS NZ : तिसऱ्या सामन्यात दोन दिग्गज खेळाडूंना दिली जाऊ शकते विश्रांती; अशी असेल भारताची प्लेयिंग 11

IND VS NZ : तिसऱ्या सामन्यात दोन दिग्गज खेळाडूंना दिली जाऊ शकते विश्रांती; अशी असेल भारताची प्लेयिंग 11

आज 24 जानेवारी रोजी भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील तिसरा वनडे सामना इंदोर येथील होलकर स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. आजच्या सामन्यासाठी भारतीय संघाच्या प्लेयिंग 11 मध्ये बदल होण्याची शक्यता आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 24 जानेवारी : भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात आज तिसरा आणि अखेरचा वनडे सामना पारपडणार आहे. यापूर्वी भारतीय संघाने मालिकेतील दोनही सामने जिंकून न्यूझीलंड विरुद्ध वनडे मालिका खिशात घातली आहे. आता तिसरा सामना देखील जिंकून भारतीय संघ न्यूझीलंडला व्हाईट वॉश देण्याच्या तयारीत आहे. परंतु आजच्या तिसऱ्या वनडे सामन्यासाठी भारतीय संघाच्या प्लेयिंग 11 मध्ये बदल होण्याची शक्यता आहे. आजच्या सामन्यात भारतीय संघातील दोन दिग्गज खेळाडू हार्दिक पांड्या आणि मोहम्मद शमी यांना विश्रांती देण्यात येण्याची शक्यता आहे. 27 जानेवारी पासून पुन्हा एकदा न्यूझीलंड विरुद्ध भारतीय संघ तीन सामन्यांची टी 20 मालिका खेळवण्यात येणार आहे. तेव्हा या टी 20 मालिकेत हार्दिक पांड्या भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे. त्यामुळे हार्दिक पांड्या ऐवजी रजत पाटीदार याला भारताच्या प्लेयिंग 11 मध्ये संधी मिळू शकते. IND VS NZ : श्रीलंकेनंतर न्यूझीलंडलाही व्हाईट वॉश देणार टीम इंडिया? आज न्यूझीलंड विरुद्ध तिसरा वनडे सामना तर तिसऱ्या सामन्यात दिग्गज गोलंदाज मोहम्मद शमी याला देखील विश्रांती दिली जाऊ शकते. मोहम्मद शमीने न्यूझीलंड विरुद्ध दोन्ही वनडे सामन्यात उत्तम गोलंदाजी केली होती. हे दोन्ही सामने जिंकून भारताने ही वनडे मालिका खिशात घातल्याने तिसऱ्या वनडे सामन्यात मोहम्मद शमी ऐवजी उमरान मलिक याला प्लेयिंग 11 मध्ये संधी दिली जाऊ शकते. आज 24 जानेवारी रोजी भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील तिसरा वनडे सामना इंदोर येथील होलकर स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. दुपारी 1:30 वाजता या सामन्याला सुरुवात होणारे असून यापूर्वी अर्धातास आधी नाणेफेक होईल.

भारताची संभाव्य प्लेयिंग 11 : रोहित शर्मा, शुभमन गिल, रजत पाटीदार, इशान किशन, सूर्यकुमार यादव, शाहबाज अहमद, वॉशिंग्टन सुंदर, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, उमरान मलिक

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या