मुंबई, 24 जानेवारी : सध्या भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात तीन सामन्यांची वनडे मालिका खेळवली जात आहे. यात भारताने मालिकेतील दोनही सामने जिंकून मालिकेत 2-0 ने आघाडी घेतली आहे. आज न्यूझीलंड विरुद्ध तिसरा वनडे सामना होणार असून हा सामना जिंकून न्यूझीलंडला व्हाईट वॉश देण्यासाठी भारतीय संघ प्रयत्न करेल.
भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात खेळवलेला पहिला सामना भारताने 12 धावांनी जिंकला होता. तर रायपूर येथे झालेल्या दुसऱ्या सामन्यातही भारताने न्यूझीलंडला गुडघे टेकायला भाग पाडले आणि 8 विकेट्सने सामना जिंकला. या दोन्ही सामन्यात भारतीय फलंदाजांसह गोलंदाजांनीही उत्कृष्ट कामगिरी केली. मागील दोन्ही सामने जिंकल्यामुळे भारताने ही मालिका देखील आपल्या नावावर केलीच आहे. परंतु आजच्या तिसऱ्या सामन्यानंतर भारताच्या मालिका विजयावर अंतिम मोहर लागेल. यापूर्वी श्रीलंके विरुद्ध झालेली तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतही भारतीय संघ श्रीलंकेला व्हाईटवॉश देण्यात यशस्वी ठरला होता.
हे ही वाचा : ICCच्या पुरुष टी20 संघात 3 भारतीयांची वर्णी, नेतृत्व या खेळाडूकडे
कधी होणार सामना :
भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील तिसरा वनडे सामना इंदोर येथील होलकर स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. दुपारी 1:30 वाजता या सामन्याला सुरुवात होणारे असून यापूर्वी अर्धातास आधी नाणेफेक होईल.
कुठे पहाल सामना :
न्यूझीलंड विरुद्धचा तिसरा वनडे सामना स्टार स्पोर्ट्सच्या विविध चॅनेल्सवर दाखवला जाणार आहे. तसेच हॉट्स स्टार अँपवर देखील या सामन्याचे थेट प्रक्षेपण केले जाईल.
भारताचा संघ:
रोहित शर्मा, शुभमन गिल, ईशान किशन, विराट कोहली, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, केएस भरत, हार्दिक पांड्या (उप कर्णधार)वॉशिंगट सुंदर, शाहबाज अहमद, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, मोहम्मद सिराद, उमरान मलिक
हे ही वाचा : ICC च्या महिला टी २० संघाची घोषणा! स्मृती मानधना सह ३ भारतीय महिला खेळाडूंचा समावेश
न्यूझीलंडचा संघ:
फिन ऍलन, डेव्हॉन कॉनवे, हेन्री निकोल्स, डॅरिल मिशेल, टॉम लॅथम, मायकेल ब्रेसवेल, ग्लेन फिलिप्स, मिशेल सँटनर, ईश सोधी, लॉकी फर्ग्युसन, ब्लेअर टिकनर, जेकब डफी, डग ब्रेसवेल, मार्क चॅपमन, हेन्री शिपले
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Cricket, Cricket news, New zealand, Team india