भारत वि. दक्षिण आफ्रिका टी20 मालिका
मुंबई, 26 सप्टेंबर**:** ऑस्ट्रेलियाला टी20 मालिकेत हरवून टीम इंडिया आता सज्ज झाली आहे ती पुढच्या आव्हानासाठी. टी 20 वर्ल्ड कपआधी टीम इंडियाचा सामना होईल तो दक्षिण आफ्रिकेशी. ऑस्ट्रेलियापाठोपाठ आता दक्षिण आफ्रिकेशी भारतीय संघ 3 टी20 सामने खेळणार आहे. लागोपाठ असलेल्या या मालिकांमुळे हैदराबादमधल्या सामन्यानंतर टीम इंडिया लगेचच केरळमध्ये दाखल होईल. कारण तिरुअनंतपुरममध्ये भारत आणि दक्षिण आफ्रिका संघातला पहिला टी20 मुकाबला होणार आहे. दक्षिण आफ्रिकन संघ दाखल टीम इंडिविरुद्धच्या टी20 मालिकेसाठी तेम्बा बवुमाच्या नेतृत्वात दक्षिण आफ्रिकन संघ भारतात दाखल झाला आहे. काल तिरुअनंतरपुरममध्ये या संघाचं स्वागत करण्यात आलं. टी20 मालिकेसह दक्षिण आफ्रिकन संघ या दौऱ्यात तीन वन डे सामनेही खेळणार आहे. भारत वि. दक्षिण आफ्रिका टी20 मालिका पहिला टी20 सामना – 28 सप्टेंबर, त्रिवेंद्रम दुसरा टी20 सामना – 2 ऑक्टोबर, गुवाहाटी तिसरा टी20 सामना – 4 ऑक्टोबर, इंदूर भारत वि. दक्षिण आफ्रिका वन डे मालिका पहिला वन डे सामना – 6 ऑक्टोबर, रांची दुसरा वन डे सामना – 9 ऑक्टोबर, लखनौ तिसरा वन डे सामना – 11 ऑक्टोबर, दिल्ली टी20 मालिकेतले सर्व सामने हे संध्याकाळी 7.00 वाजता तर वन डे मालिकेतील सामने दुपारी 1.30 वाजता सुरु होतील. या सामन्यांचं प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्स नेटवर्क आणि डिस्ने हॉटस्टारवरुन केलं जाणार आहे.
हेही वाचा - ICC T20 Ranking: ऑस्ट्र्लियाला हरवून टीम इंडिया रॅन्किंगमध्ये आणखी स्ट्राँग, पाहा ICC ची ताजी क्रमवारी **भारतीय टी20 संघ –**रोहित शर्मा (कर्णधार), लोकेश राहुल (उपकर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, रिषभ पंत (विकेट किपर), दिनेश कार्तिक (विकेट किपर), रवीचंद्रन अश्विन, युजवेंद्र चहल, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग, मोहम्मद शमी, हर्षल पटेल, दीपक चहर, जसप्रीत बुमराह दक्षिण आफ्रिकेचा टी20 संघ - तेम्बा बवुमा (कर्णधार), क्विंटन डी कॉक, रिझा हँड्रिक्स, हेनरिक क्लासेन, केशव महाराज, एडन मार्करम, डेविड मिलर, लुंगी एनगिडी, एनरिक नॉकिया, वेन पार्नेल, ड्वेन प्रिटोरियस, कगिसो रबाडा, रिले रुसो, तबरेझ शम्सी, ट्रिस्टन स्टब्स, ब्यॉर्न फॉर्च्यून, मार्को यान्सन आणि एंडिल फेहलुकवायो