JOIN US
मराठी बातम्या / अध्यात्म / येळकोट येळकोट जय मल्हार! जेजुरी ह्या गावी मल्हारी देवस्थान आहे

येळकोट येळकोट जय मल्हार! जेजुरी ह्या गावी मल्हारी देवस्थान आहे

श्री खंडोबा हे महाराष्ट्राचे कुलदैवत आहे या देवतेची लोकप्रियता खूप व्यापक आहे

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 15 मे:  मुख्यत्वेकरून महाराष्ट्र आणि कर्नाटक या राज्यांत खंडोबाची उपासना जास्त केली जाते.

 कृतयुगात ‘मणी’ व ‘मल्ल’ या राक्षसांना ब्रह्म देवाने, “तुमचा पराभव कोणी करू शकणार नाही” हा वर दिला त्यामुळे ते उन्मत्त होऊन लोकांना त्रास देऊ लागले .ऋषीमुनी करीत असलेल्या तपश्चर्येला अडथळा आणून तेथे विध्वंस करू लागले. ऋषीमुनींनी अखेर कंटाळून देवांकडे मदत मागितली.

 खंडोबांनी ऋषींच्या विनंतीला मान देऊन  लिंगद्वय रूपाने प्रगट झाले.  त्यांनी ‘ मणी’ राक्षसाला त्याची छाती फोडून त्याला जमिनदोस्त केले. त्यावेळी ‘मणी’ राक्षसाने शरण येऊन “    तुझ्या चरणी माझ्या मस्तकाला स्थान दे व माझे अश्वारूढ रूपही तुझ्या शेजारी राहावे” अशी  इच्छा व्यक्त करून शरणागती मागितली व भगवान शंकरांनी तथास्तु म्हटले.

नशीब उजळण्यासाठी या उपायांचा करा अवलंब

नंतर मार्तंड भैरवांनी ‘मल्ल’ राक्षसाचा पराभव केला , तेव्हा त्याने ही शरण जाऊन “तुमच्या नावाआधी माझे नाव जोडले जावे अशी मागणी केली.” तथास्तु म्हणून मार्तंड भैरवाने मान्य केले. तेंव्हापासून त्यांना मल्हारी (मल्ल+अरी) मार्तंड असे म्हणण्यात येते. तेथे पायाशी असलेल्या दैत्यांना मांसाहारी नैवेद्य आणि देवाला गोडाचा नैवेद्य केला जातो.

या  व्रतात पाच दिवस उपवास करून सहाव्या दिवशी तो सोडतात. सहा दिवस देवापुढे नंदादीप ठेवतात. देवाला बेल, दवणा व झेंडूची फुले फार प्रिय आहेत म्हणून ती आठवणीने वाहतात.

वास्तुशास्त्रानुसार घरामध्ये लावा या रंगांचे पडदे

चंपाषष्ठी,  खंडोबाच्या उपासनेत  खंडोबाच्या कुलधर्मासाठी व चंपाषष्टी या दिवशी कणकेचा रोडगा, वांग्याचे भरीत, पातीचा कांदा व लसूण ह्या पदार्थांचा नैवेद्य देवाला  समर्पण करण्यापूर्वी तळी भरण्याचा विधि असतो. अशा प्रकारे उपवासाची सागंता केली जाते.

तळी भरणे म्हणजे देवाचा टाक घेऊन एका ताम्हनात विड्याचे पान, पैसा, सुपारी, भंडारा व खोबरे हे पदार्थ ठेवून ते ताम्हन " सदानंदाचा येळकोट" किंवा “येळकोट येळकोट जय मल्हार” असे मोठ्याने तीन वेळा म्हणून तीन वेळा उचलतात. नंतर दिवटी व बुधली घेऊन आरती करतात.

खंडोबाच्या उपासनेत  भंडारा फार महत्वाचा आहे. भंडारा म्हणजे हळदीची पूड ,खोबरं देवाकडे तोंड करून भंडारा व खोबरे उधळतात आणि त्याचाच प्रसाद वाटतात .

(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या