बृहस्पति ज्याला गुरू म्हणतात तो विद्येचा आणि बुद्धीचा ग्रह आहे. हा ग्रह कुंडलीत अनुकूल स्थानावर असताना आश्चर्यकारक आणि सकारात्मक परिणाम आणू शकतो कमकुवत बृहस्पति असलेल्या व्यक्तीला ज्ञानाचा अभाव असू शकतो. समाजात व्यक्तीची प्रतिमा खराब होऊ शकते. तुमचा अनादरही होऊ शकतो. सोपे उपाय तुमच्या बृहस्पतिला देतील शक्ती तुम्ही तुमच्या कपाळावर हळद किंवा केशरी चंदनाचा टिळा लावू शकता. तुमच्या दैनंदिन जीवनात पिवळा रंग परिधान करणे देखील मदत करते. कोणतीही नवीन गोष्ट सुरू करण्यापूर्वी सलग 8 दिवस मंदिरात हळद दान करा. गुरुवारी गायीला गूळ खाऊ घाला. गुरुवारी व्रत पाळल्याने तुमचा बृहस्पति मजबूत होतो (सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)