रायचंद शिंदे (प्रतिनिधी) जुन्नर, 7 जुलै: जुन्नर तालुक्यातील सहयाद्रीच्या रांगेत असलेल्या नाणेघाट परिसरातला हा सगळा आगळा वेगळा नजारा पाहून तुमचे डोळे नक्की तृप्त होतील.मागील 8 दिवसापासून घाटमाथ्यावर पडणाऱ्या पावसाने धबधबे वाहू लागलेत आणि नाणेघाट परिसरातल सगळं पाणी खाली कोकणात वहात जात आहे.मात्र कोकणातून वर येणार वारा एवढा जोरात आहे की हे सगळं पाणी पुन्हा मागे वळवत आहे.वाऱ्याच्या प्रेशरमुळे पाण्याचं अक्षरशः बाष्प होऊन पुन्हा माघारी येत आहे. या फॉगिंगमध्ये लपेटलेला नानाचा अंगठा आणि या परिसरातील सौंदर्य अद्भूत आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.