मुंबई, 15 फेब्रुवारी: पवित्र व्रतवैकल्यांमध्ये नवरात्री, पौर्णिमा, अमावास्या आणि एकादशी ही मुख्य व्रते आहेत. त्यातही एकादशी हे सर्वात मोठे व्रत मानले जाते. चंद्राच्या स्थितीमुळे व्यक्तीची मानसिक आणि शारीरिक स्थिती चांगली अथवा वाईट होत असते. अशा स्थितीत एकादशीचे व्रत केल्यास चंद्राचे वाईट प्रभाव थांबू शकतात. एकादशीचे व्रत करून ग्रहांचा प्रभावही बऱ्याच अंशी कमी होऊ शकतो. आपल्या नावानुसारच विजया एकादशीला विजय मिळवून देणारी मानली जाते. या एकादशीला भगवान विष्णूची पूजा केली जाते. या एकादशीचे व्रत केल्यास भयंकर संकटांपासून मुक्ती मिळते. विजया एकादशीला उपासना केल्याने सर्वात शक्तिशाली शत्रूंचा पराभव होऊ शकतो. यावेळी विजया एकादशीच्या तारखेबाबत लोकांमध्ये संभ्रम आहे की, विजया एकादशी 16 फेब्रुवारीला साजरी होणार की 17 फेब्रुवारीला! महाशिवरात्रीला घरात आणा या 6 शुभ गोष्टी, घरात नांदेल सुख-समृद्धी विजया एकादशीचा शुभ मुहूर्त फाल्गुन महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशीला विजया एकादशीचे व्रत केले जाते. ज्योतिषांच्या म्हणण्यानुसार, यावेळी विजया एकादशी 16 फेब्रुवारी आणि 17 फेब्रुवारी या दोन्ही दिवशी साजरी केली जाईल. विजया एकादशीची तारीख 16 फेब्रुवारी रोजी सकाळी 05.32 वाजता सुरू होईल आणि 17 फेब्रुवारी रोजी दुपारी 02.49 वाजता समाप्त होईल. उदयतिथीनुसार, विजया एकादशी 16 फेब्रुवारीलाच साजरी केली जाईल. वैष्णव समाजाची एकादशी 17 फेब्रुवारीलाच साजरी होणार आहे. विजया एकादशीचे पारणे 17 फेब्रुवारी रोजी सकाळी 08:01 ते 09:13 पर्यंत असेल. विजया एकादशीची पूजा पद्धत विजया एकादशीच्या एक दिवस आधी त्यावर वेदी करून त्यावर सात धान्ये ठेवावी. विजया एकादशीच्या दिवशी श्रीहरीची कलशावर स्थापना करावी. यानंतर भक्तिभावाने श्रीहरीची पूजा करावी. डोक्यावर पांढरे चंदन किंवा गोपी चंदन लावून पूजा करावी. त्यानंतर पंचामृत, फुले आणि ऋतुनुसार फळे अर्पण करा. या दिवशी व्रत ठेवणे अत्यंत शुभ मानले जाते, आहार घ्यायचा असेल तर सात्त्विक आहार घ्या. संध्याकाळी अन्न घेण्यापूर्वी पूजा आणि आरती करा. दुसऱ्या दिवशी सकाळी तोच कलश आणि अन्न व वस्त्र दान करा. Shattila Ekadashi 2023: षटतिला एकादशीला टाळा या चुका; भगवान विष्णूंची लाभेल कृपादृष्टी विजया एकादशीची खबरदारी 1. उपवास ठेवलात तर खूप चांगलं होईल, नाहीतर सात्विक अन्न एका वेळी घ्यावं. 2. विजय एकादशीच्या दिवशी भात आणि जड अन्न खाऊ नये. 3. या दिवशी रात्री भगवान विष्णूची पूजा करणे आवश्यक आहे. 4. या दिवशी रागावू नका, बोलण्यावर नियंत्रण ठेवा आणि आचरणावरही नियंत्रण ठेवा. विजया एकादशी व्रताची कथा असे म्हणतात की, त्रेतायुगात भगवान श्रीराम लंकेवर आक्रमण करण्यासाठी समुद्रकिनारी पोहोचले होते, तेव्हा मर्यादा पुरुषोत्तम यांनी समुद्र देवाला मार्ग देण्याची प्रार्थना केली होती, परंतु समुद्रदेवतेने श्रीरामांना लंकेला जाण्याचा मार्ग दिला नाही. वक्दलाभ्य मुनींच्या आदेशाने प्रभु श्रीरामाने विजय एकादशीचे व्रत पाळले, ज्याच्या प्रभावाने समुद्राने श्रीरामाला मार्ग दिला. यासोबतच विजया एकादशीचे व्रत रावणावर विजय मिळवून देण्यासाठी उपयुक्त ठरले आणि तेव्हापासून ही तिथी विजया एकादशी म्हणून ओळखली जाते. (सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)