JOIN US
मराठी बातम्या / अध्यात्म / Vat Purnima 2023: 34 वर्षानंतर लावलं कुंकू, 'ती'नं वडही पूजला, वर्ध्यात दिसली आधुनिक सावित्री, Video

Vat Purnima 2023: 34 वर्षानंतर लावलं कुंकू, 'ती'नं वडही पूजला, वर्ध्यात दिसली आधुनिक सावित्री, Video

वटपौर्णिमा हा सण महाराष्ट्रात सर्वत्र उत्साहात साजरा केला जातो. वर्ध्यातील महिलांनी पती निधन झाल्यानंतर वडाची पूजा करून सामाजिक क्रांतीच्या दिशेनं पाऊल टाकलं आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

अमिता शिंदे, प्रतिनिधी वर्धा, 3 जून: भारतात प्रत्येक सण, उत्सव साजरे करण्यामागे शास्त्रीय कारणही आहेत. मात्र हे सण उत्सव साजरे करताना काही चुकीच्या प्रथाही त्यासोबत जोडल्या गेल्या आहेत. विशेषत: पती हयात असणाऱ्या स्त्रियांना सौभाग्यवती म्हणून सर्व सण उत्सव आणि धार्मिक कार्यक्रमांत मान दिला जातो. मात्र, पतीचे निधन झालेल्या महिलांना विधवा म्हणून जीवन जगावे लागते. वटपौर्णिमेसारख्या सणातही या महिला सहभागी होऊ शकत नाहीत. याला फाटा देत महिलांना सन्मानाचं जीवन देण्याचं काम वर्ध्यातील आधुनिक सावित्री करत आहेत. पतीचे निधन झालेल्या महिलांनाही मनासारखं जगण्याचा अधिकार आहे, असाच संदेश या अनोख्या वटपौर्णिमेतून देण्यात आला आहे. पती निधन झालेल्या महिलांनी केली वडाची पूजा वर्ध्यात पती निधनानंतर काही महिलांनी हळदी कुंकू लावत आज वटपौर्णिमेनिमित्त वडाची पूजा केली. काही महिलांच्या पतीचे निधन होऊन 30 ते 40 वर्षे होऊन गेली होती. त्यानंतर पहिल्यांदाच या महिलांनी कपाळावर कुंकू लावलं आणि वडाला फेऱ्या घातल्या. या क्रांतिकारी निर्णयाने आमच्या जीवनात पुन्हा आनंद आला असून प्रत्येक महिलेने हा सण उत्सव साजरा केला पाहिजे, असे या महिलांनी सांगितले. त्यासाठी येथील सामाजिक कार्यकर्त्या वनिता चलाख आणि ज्योती देवतारे यांनी पुढाकार घेतला.

महिलांबद्दलचा समाजाचा दृष्टिकोन बदलावा पती निधनानंतरही महिलांना सर्व सण उत्सवात सहभागी होता आलं पाहिजे. विधवा महिला संदर्भात समाजाचा दृष्टिकोन बदलला पाहिजे. वटसावित्री, मकर संक्रांती, नवरात्री, हरतालिका यासारखे आवडीचे सण सर्व महिलांनी एकत्रित येत उत्साहाने आनंदाने साजरे करावेत. विधवा आणि सौभाग्यवती असा भेदभाव करू नये, असा संदेश देत सर्व महिलांनी वटवृक्षाची पूजा केली. Vat Purnima 2023: पती निधनानंतर क्रांतिकारी पाऊल, वनिता ताईंचा महिलांना संदेश, Video यापुढे दरवर्षी सर्व महिला येतील एकत्र गेल्या अनेक वर्षांपासून पतीचे निधन झाल्यामुळे वटवृक्षाची पूजा न केलेल्या महिलांनीही लाल कुंकू कपाळावर लावत आणि आवडीच्या रंगाची साडी नेसून वटपौर्णिमा उत्साहात साजरी केली. येणाऱ्या प्रत्येक वर्षी देखील सर्व महिला महिलांचे सर्व सण एकत्रित रित्या साजरे करतील आणि पतीचे निधन झालेल्या महिला संदर्भातील समाजाचा वाईट दृष्टिकोन बदलेल. तसेच वर्ध्यातील वनिता चलाख आणि ज्योती देवतारे यासारख्या सामाजिक कार्यकर्त्या महिलांच्या प्रयत्नांना यश मिळेल अशीच आशा करूयात.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या