जाहिरात
मराठी बातम्या / अध्यात्म / Vat Purnima 2023: पती निधनानंतर क्रांतिकारी पाऊल, वनिता ताईंचा महिलांना संदेश, Video

Vat Purnima 2023: पती निधनानंतर क्रांतिकारी पाऊल, वनिता ताईंचा महिलांना संदेश, Video

Vat Purnima 2023: पती निधनानंतर क्रांतिकारी पाऊल, वनिता ताईंचा महिलांना संदेश, Video

Vat Purnima 2023: पती निधनानंतर क्रांतिकारी पाऊल, वनिता ताईंचा महिलांना संदेश, Video

Vat Purnima 2023: पतीच्या निधनानंतर वर्ध्यातील वनिता चलाख यांनी क्रांतिकारी पाऊल उचललं आहे. त्यांचं हे पाऊल विधवा महिलांसाठी दिशादर्शक आहे.

  • -MIN READ Wardha,Maharashtra
  • Last Updated :

अमिता शिंदे, प्रतिनिधी वर्धा, 1 जून: बदलत्या काळानुसार पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या रूढी परंपरांना बगल देत पुरोगामी जीवन जगण्याचे विचार आजच्या पिढीमध्ये हळूहळू रुजत असताना दिसतात. विधवा विवाह, सती परंपरा, बालविवाह असो किंवा महिलांबद्दलच्या अनेक रूढी, परंपरा महिलाच पुढे येऊन बदलत आहेत. वर्ध्यातील अशीच एक सावित्री सध्या समाजाची आदर्श ठरतेय. पतीच्या निधनानंतरही सौभाग्यवती प्रमाणे साजशृंगार करून आयुष्यभर पतीच्या आठवणी जपणाऱ्या या सावित्रीने विधवा महिलांना अनोखा संदेश दिला आहे. शिक्षक पतीचं अकाली निधन वनिताताई आणि निरंजनराव चलाख हे पती-पत्नी शिक्षक होते. हसतखेळत सुखाचा संसार सुरू असताना 3 वर्षांपूर्वी पती निरंजनराव यांचं अकाली निधन झालं. या घटनेने कुटुंबावर मोठा दुःखाचा डोंगर कोसळला. मात्र वनिता ताई आपल्या पतीचे निधन झालेय असे मानत नाहीत.

News18लोकमत
News18लोकमत

रोज करतात सौभाग्यवतीचा शृंगार पतीच्या निधनानंतरही सुवासिनींप्रमाणे मंगळसूत्र, हिरवी साडी, हिरव्या बांगड्या, लाल टिकली, जोडवे असा सर्व साजशृंगार वनिता ताई करतात. आपले पती आपल्यासोबत आहेत आणि साजशृंगार करणं महिलांचा अधिकार आहे, असे त्या सांगतात. कोणीही विधवा आणि सौभाग्यवती यामध्ये भेदभाव करून विधवेला हीन वागणूक देऊ नये असे त्या सतत प्रबोधन करतात. Vat Purnima 2023: वटसावित्रीची पूजा करण्यापूर्वी पाहा ‘हा’ Video, मिळतील तुमच्या प्रश्नांची उत्तरं महिलांचे सर्व सण-उत्सव करतात साजरे वनिता ताई या दरवर्षी महिलांच्या सण-उत्सवात उत्स्फूर्तपणे सहभागी होतात. वटपौर्णिमा, मकर संक्रांत, नवरात्री, हरतालिका अशा महिलांच्या विशेष आणि आवडत्या सणांमध्ये सामाजिक कार्यक्रम आयोजित करून विधवा आणि सुवासिनी महिलांना एकत्रित करून कार्यक्रम साजरे करतात. मकर संक्रांतीच्या सणामध्ये वाण घेणे हळदीकुंकू या सर्व परंपरा त्या जपतात. वैधव्य हे फक्त महिलांसाठीच का? वैधव्य हे फक्त महिलांनाच का ? पुरुषांसाठी का नाही? पती गेल्यावर पत्नीने शृंगार का करू नये? असा प्रश्न त्यांना सतत पडत होता. त्यामुळे त्यांनी हा नवा बदल घडविण्यासाठी प्रयत्न केला आहे. त्या अनेक विधवा महिलांना मानसिक आधार देऊन त्यांना बदलत्या काळानुसार विचारही बदलण्यासाठी जनजागृती करतात. महिलांना वैधव्य आलं तरीही त्यांनी आपल्या हक्काचं कुंकू, मंगळसूत्र, आवडत्या रंगाची साडी आणि साजशृंगार करावा. समाजातील अनेक कार्यक्रमांमध्ये विधवा आणि सौभाग्यवती असा भेदभाव न करता एकत्रितपणे सण साजरे करा, असा संदेशही त्या देतात. Vat Purnima 2023: वर्ध्याची खरी सावित्री! संसार वाचविण्यासाठी पतीला दिली किडनी, Video दोघेही योग मार्गदर्शक वनीताताई आणि पती निरंजनराव हे दोघेही 15 वर्षांपासून योगाशी जोडले गेले. त्यात त्यांनी प्राविण्य मिळवलं. वनिताताई आजही इतरांना योगा प्राणायामविषयी मार्गदर्शन करतात. उत्कृष्ट महिला योग मार्गदर्शक म्हणूनही त्यांची ओळख आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात