मुंबई, 5 जुलै: ज्योतिषशास्त्रानुसार रत्न धारण केल्याने ग्रहांचा अशुभ प्रभाव कमी होतो. प्रत्येक ग्रहाशी संबंधित एक रत्न आहे. कुंडलीतील ग्रहांच्या स्थितीच्या आधारावर ते परिधान केले जातात. पण काही रत्ने इतकी ताकदवान असतात की त्यांना एकत्र धारण केल्याने समस्या वाढतात आणि व्यक्तीला अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. चला जाणून घेऊया कोणते रत्न एकत्र परिधान करू नये. Fengshui Vastu: संपत्तीत होईल वाढ, या खास वस्तू आजच आणा घरी! पुष्कराज, प्रवाह आणि मोतीसह पाचू घालू नका जर एखाद्या व्यक्तीने पाचू धारण केला असेल तर त्याने पुष्कराज, प्रवाळ आणि मोतीरत्न धारण करू नये. ज्योतिषशास्त्रानुसार पाचू हे बुध ग्रहाचे रत्न आहे आणि हे रत्न धारण केल्याने बुध ग्रहाचा अशुभ प्रभाव कमी होतो. पण पुष्कराज, प्रवाळ आणि मोत्यासोबत पाचू धारण केल्याने धनहानी होते. या 5 राशीच्या लोकांनी अजिबात घालू नये हिरा, संकटांना द्याल आमंत्रण माणिक, प्रवाळ आणि पुष्कराजचे लसुनिया घालू नका जर एखाद्या व्यक्तीने लसुनिया किंवा लसण्या रत्न घातला असेल तर त्याने त्यासोबत माणिक, प्रवाळ आणि पुष्कराज रत्न घालू नये. लसुनियासोबत हे रत्न धारण केल्याने जीवनात अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. माणिक, प्रवाळ, मोती आणि पुष्कराजसोबत निळा नीलम घालू नका जर एखाद्या व्यक्तीने निळा नीलम घातला असेल तर त्याने त्यासोबत माणिक्य, प्रवाळ, मोती आणि पुष्कराज ही रत्ने घालू नयेत. असे केल्याने उलट परिणाम होऊ शकतो. हिरा, पाचू, नीलम, गोमेद आणि लसण्यासह मोती घालू नका जर एखाद्या व्यक्तीने मोती परिधान केला असेल तर त्याने त्याच्यासोबत हिरा, पाचू, गोमेद, नीलम आणि लसण्या रत्न घालू नये. चंद्राचा अशुभ प्रभाव कमी करण्यासाठी ज्योतिषी मोती घालण्याची शिफारस करतात. पण जर एखाद्या व्यक्तीने ही रत्ने मोत्यांसोबत घातली तर ही रत्ने मिळून मानसिक तणाव निर्माण होऊ शकतो. (सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)