मुंबई, 3 जुलै: फेंगशुई हे चिनी वास्तुशास्त्र आहे. फेंग आणि शुई म्हणजे वायू आणि पाणी. भारतीय वास्तुशास्त्राप्रमाणे फेंगशुईदेखील खूप लोकप्रिय आहे. फेंगशुईमध्ये सांगितलेल्या अनेक उपायांच्या मदतीने घरात सुख-समृद्धी येते आणि वास्तुदोष दूर होतात. Guru Purnima: आज आहे गुरुपौर्णिमा, जाणून घ्या तिथी, शुभ मुहूर्त आणि पूजा करण्याची पद्धत फेंगशुईमध्ये विंड चाइम्स, लाफिंग बुद्धा, प्लास्टिकची फुले, कासव, नाणी आणि जहाजे इत्यादींना विशेष महत्त्व आहे. असे मानले जाते की त्यांना घर किंवा ऑफिसमध्ये विशिष्ट दिशेला ठेवल्यास व्यक्तीला जीवनात सुख आणि संपत्ती प्राप्त होते. जाणून घ्या फेंगशुई उपाय… लाफिंग बुद्धा फेंगशुईमध्ये लाफिंग बुद्धाला खूप शुभ मानले जाते. असे मानले जाते की ही मूर्ती ड्रॉइंग रूमच्या अगदी समोर घरात सकारात्मक ऊर्जा आणते. नशिबाची प्राप्ती होते. बुधादित्य योगात साजरी होणार गुरुपौर्णिमा; महादेव आणि भगवान विष्णूसह वेद व्यासांची अशी करा पूजा डायनिंग टेबल फेंगशुईनुसार गोलाकार डायनिंग टेबल फेंगशुईमध्ये खूप शुभ मानले जाते. लक्षात ठेवा की घरात असे डायनिंग टेबल आणा ज्यामध्ये टेबलला जोडलेल्या खुर्च्यांची संख्या कमी असेल. फेंगशुई कॉइन फेंगशुईनुसार घराच्या दरवाजाच्या हँडलमध्ये नाणी लटकवल्याने धन आणि सौभाग्य प्राप्त होते. तीन जुनी फेंगशुई नाणी लाल धागा किंवा रिबनमध्ये बांधून दरवाजाच्या हँडलमध्ये लटकवावीत. असे केल्याने धनप्राप्ती होते असे मानले जाते. फिश अॅक्वेरियम फेंगशुईनुसार फिश अॅक्वेरियम हे प्रगतीचे प्रतीक आहे. घरात फिश अॅक्वेरियम ठेवल्याने सुख-समृद्धी येते. घरामध्ये समस्या आहे तर आजच बदला घड्याळाची दिशा, कारण घ्या ऐकून बांबूचे रोप फेंगशुईनुसार बांबूचे रोप घरात ठेवल्याने नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव कमी होतो आणि घरात सकारात्मक ऊर्जा वाढते. मीठ किंवा तुरटी फेंगशुईनुसार बाथरूममध्ये पूर्ण मीठ किंवा तुरटीने भरलेली वाटी ठेवा. या वाटीचे मीठ किंवा तुरटी महिनाभरात बदलत राहा. असे मानले जाते की असे केल्याने घरात सकारात्मक ऊर्जा वाढते. (सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.