मुंबई, 29 ऑक्टोबर : हिंदू धर्मात तुळशीला विशेष महत्त्व आहे. तुळशीला आपल्याकडे मातेसमान, देवासमान दर्जा आहे. घरात तुळस असणं शुंभ असतं. यामागे केवळ अध्यात्मिक महत्व आहे असे नाही. तर वैज्ञानिक कारणही खूप महत्वाचे आहे. तुळस मोठ्या प्रमाणात प्राणवायू म्हणजेच ऑक्सिजन देते. त्यामुळे रोज सकाळी तुळशीच्या सानिध्यात राहून पूजा करणे आपल्या रोग्यांसाठी खूप फायदेशीर असते. तर अशा या तुळशीचे लग्न लावल्यानंतरच आपल्याकडे लग्नसराईला सुरुवात होते. तुळशी विवाहाबाबत अनेक पौराणिक समजुती आहेत. तुळशी विवाहाच्या दिवशी काही उपाय केल्यास अनेक समस्या दूर होतात. या दिवशी काही विशिष्ट उपाय केल्याने विवाहात उशीर होण्याशी संबंधित समस्याही दूर होतात आणि वैवाहिक जीवनात सुरू असलेल्या समस्याही दूर होतात, अशी मान्यता आहे.
Tulsi Vivah 2022 Date : दिवाळीनंतर आता तुळशीचं लग्न कधी? इथं पाहा तिथी आणि शुभ मुहूर्तमंत्राचा जप करा तुळशीविवाहाच्या दिवशी ‘ओम भगवते वासुदेवाय नमः’ या मंत्राचा 108 वेळा जप करावा. यामुळे वैवाहिक जीवनातील त्रासही दूर होतो आणि जीवन आनंदी राहते. तसेच आपसात वाद झाला तर तो मिटतो.
घरातील कलह संपतात धार्मिक ग्रंथ आणि ज्योतिषांच्या मते, तुळशी विवाहाच्या दिवशी तुळशीची पाने पाण्यात ठेवून दुसऱ्या दिवशी घराच्या मुख्य दरवाजात ते पाणी शिंपडल्याने घरातील कलह कमी होऊन सकारात्मक वातावरण निर्माण होते. घरातील तणावापासूनही आराम मुक्ती मिळते. सर्व त्रास दूर होतात तुळशीविवाहाच्या दिवशी तुळशी मातेला लाल वस्त्र अर्पण करावे आणि ते वस्त्र विवाहित स्त्रीला दान करावे. यामुळे कौटुंबिक जीवनात सुसंवाद राहतो आणि पती-पत्नीचे सर्व त्रास दूर होतात. योग-प्राणायम करताना अशा गोष्टींची घ्या काळजी; या दिशेला तोंड केल्यानं मिळतो फायदा वैवाहिक जीवनातील अडथळे दूर होतील असेही मानले जाते की जर एखाद्या मुलीच्या लग्नात विलंब होत असेल किंवा कोणत्याही प्रकारचे अडथळे येत असतील तर तुळशी विवाहाच्या दिवशी तुळशीमातेला लाल रंगाचे वस्त्र अर्पण करावे आणि दुसऱ्या दिवशी ते वस्त्र आपल्याजवळ ठेवावे. असे केल्याने लग्नात येणारे अडथळे दूर होतात असे म्हणतात.