मुंबई, 27 ऑक्टोबर : हिंदू धर्मात लग्न हा खूप पवित्र आणि आनंदाचा सोहळा मनाला जातो. त्यामुळे साहजिकच लग्नासाठी विशेष मुहूर्त पाहिले जातात आणि त्याच मुहूर्तांना लग्न लावले जाते. मात्र तुम्हाला माहिती आहे का? आपल्या कडे लग्नाच्या मुहूर्तांना सुरुवात तुळशीच्या लग्नापासून केली जाते. तुळशीच्या लग्नापासून हिंदू धर्मात लग्न आणि इतर शुभ कार्याला सुरुवात होते. यादिवशी तुळशीशी शालिग्रामचा विवाह करण्याची परंपरा आहे. जो भक्त तुळशीविवाहाचा विधी करतो, त्याला कन्यादानाचे पुण्य मिळते, असे मानले जाते. तुळशी विवाहासाठी अंगणाच्या मध्यभागी तुळशीचे रोप लावले जाते. तुळशीच्या समोर मेहंदी, मोली धागा, फुले, चंदन, सिंदूर, सुहाग वस्तू, तांदूळ आणि मिठाई पूजेच्या साहित्याच्या स्वरूपात ठेवली जाते. तुळशीविवाह केल्याने वैवाहिक जीवन सुखी होते. जाणून घेऊया तुळशीविवाहाचा यंदा तुळशी विवाह कधी संपन्न होणार आहे. पाहा शुभ मुहूर्त आणि पूजा विधी.
योग-प्राणायम करताना अशा गोष्टींची घ्या काळजी; या दिशेला तोंड केल्यानं मिळतो फायदातुळशी विवाहासाठी शुभ मुहूर्त पौराणिक कथेनुसार कार्तिक महिन्यात भगवान विष्णूचे शालिग्राम स्वरूप आणि माता तुळशीचा विवाह करण्याचा नियम आहे. एकादशीच्या दिवशी चातुर्मास संपल्यानंतर दुसऱ्या दिवशी तुळशी विवाहाचे आयोजन केले जाते. पंचांगानुसार यंदा 5 नोव्हेंबर (शनिवार) पासून तुळशी विवाहाला प्रारंभ होणार आहे. 5 नोव्हेंबर रोजी संध्याकाळी 06.08 वाजता द्वादशी तिथी सुरू होईल. द्वादशी तिथी 6 नोव्हेंबर (रविवार) संध्याकाळी 05:06 मिनिटांपर्यंत राहील. तुळशी विवाहाचा शुभ मुहूर्त 6 नोव्हेंबरला दुपारी 01:09 ते 03:18 पर्यंत राहील.
तुळशी विवाहाची पूजा पद्धत तुळशी विवाहासाठी पाटावर आसन टाकून तुळस आणि शाळीग्राम मूर्तीची प्रतिष्ठापना करावी. पट्टभीवती ऊस किंवा केलुयाच्या पानांचा मंडप सजवा आणि कलश बसवा. सर्वप्रथम कलश आणि गौरी गणेशाची पूजा करावी. यानंतर माता तुळशीला आणि भगवान शालिग्रामला धूप, दिवा, वस्त्र, माळा, फुले अर्पण करा. तुळशीला श्रृंगार आणि लाल ओढणी अर्पण केली जाते. असे केल्याने सुखी वैवाहिक जीवनाचा आशीर्वाद मिळतो. यानंतर तुलसी मंगाष्टक पठण करावे. यानंतर भगवान विष्णू आणि तुळशीची आरती करावी. पूजेनंतर प्रसादाचे वाटप करावे. या पूजेमध्ये मुळा, रताळे, पाणी तांबूस, आवळा, मनुका, मुळा यांसह कोथिंबीर पेरू आणि इतर हंगामी फळे अर्पण करा. हनुमानाची या रुपातील मूर्ती/फोटो घरात लावणं असतं शुभ; संकटांचा होतो नाश तुलसी विवाह कथा पौराणिक कथेनुसार, एकदा माता तुळशीने भगवान विष्णूंना क्रोधाने शाप दिला की ते काळा दगड होतील. या शापापासून मुक्ती मिळवण्यासाठी देवाने शालिग्राम पाषाणाच्या रूपात अवतार घेतला आणि तुळशीशी विवाह केला. दुसरीकडे तुळशीला देवी लक्ष्मीचा अवतार मानले जाते. अनेकजण एकादशीला तुळशीविवाह करत असले तरी कुठेतरी तुळशीविवाह द्वादशीच्या दिवशी होतो. अशा परिस्थितीत तुळशी विवाहासाठी एकादशी आणि द्वादशी या दोन्ही तिथींची वेळ निश्चित करण्यात आली आहे.