जाहिरात
मराठी बातम्या / अध्यात्म / योग-प्राणायम करताना अशा गोष्टींची घ्या काळजी; या दिशेला तोंड केल्यानं मिळतो फायदा

योग-प्राणायम करताना अशा गोष्टींची घ्या काळजी; या दिशेला तोंड केल्यानं मिळतो फायदा

योग-प्राणायम करताना अशा गोष्टींची घ्या काळजी; या दिशेला तोंड केल्यानं मिळतो फायदा

योगाच्या महत्त्वासोबतच त्याचे नियमही शास्त्रात सांगण्यात आले आहेत. नियमानुसार योगासने केल्यासच त्याचे फायदे मिळतात. जाणून घेऊया योग आणि प्राणायामाशी संबंधित काही महत्त्वाचे नियम.

  • -MIN READ Kolhapur,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 27 ऑक्टोबर : आजच्या धकाधकीच्या जीवनात लोक स्वतःसाठी वेळ काढू शकत नाहीत. वेळेच्या कमतरतेमुळे, लोकांना सर्वकाही लवकर निकाली काढायचे असते. चांगले आरोग्य आणि आनंदी जीवनासाठी अनेकजण योग आणि प्राणायाम करतात, परंतु घाईघाईत बरेच लोक योग आणि प्राणायामच्या नियमांकडे दुर्लक्ष करतात, ज्यामुळे योगाचे समाधानकारक परिणाम मिळत नाहीत. योगाच्या महत्त्वासोबतच त्याचे नियमही शास्त्रात सांगण्यात आले आहेत. नियमानुसार योगासने केल्यासच त्याचे फायदे मिळतात. जाणून घेऊया योग आणि प्राणायामाशी संबंधित काही महत्त्वाचे नियम. योग आणि प्राणायामाचे महत्त्व - पंडित इंद्रमणी घनश्याल सांगतात की, योगाची अनेक भागात विभागणी केली गेली आहे. योगाच्या 8 भागांपैकी चौथ्या भागाला प्राणायाम म्हणतात. प्राणायाम हा दोन शब्दांनी बनलेला आहे, पहिला प्राण आणि दुसरा आयाम, ज्याचा अर्थ प्राणांचा विस्तार करणे. प्राणायाम हा शरीरातील शक्ती नियंत्रित आणि संतुलित करण्यासाठी केला जातो. या धावपळीच्या जीवनात आजार, मानसिक ताण, स्नायू दुखणे इत्यादी समस्या जाणवतात. योगासनांमुळे या सर्वांपासून सुटका होते. योगामुळे शरीराची प्रतिकारशक्तीही वाढते, त्यामुळे सर्व वयोगटातील लोकांना योगासने करण्याचा सल्ला दिला जातो.

News18लोकमत
News18लोकमत

योगाचे नियम - योगासने करण्याचे नियम शास्त्रातही सांगितले आहेत. कोणताही प्राणायाम करण्यासाठी तुम्ही सुखासन, पद्मासन आणि सिद्धासन स्थितीत बसू शकता. प्राणायाम सकाळी लवकर करावा. प्राणायाम करताना चेहऱ्यावर नेहमी हास्य ठेवा. कोणत्याही प्रकारचा आवाज नसेल अशा ठिकाणी बसावे. त्यात सर्वात महत्त्वाचे म्हणजे दिशा. हे वाचा -  हनुमानाची या रुपातील मूर्ती/फोटो घरात लावणं असतं शुभ; संकटांचा होतो नाश वास्तुशास्त्रानुसार ईशान्य दिशेला तोंड करून योगासन किंवा प्राणायाम करावा. यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढेल. तसेच ज्या ठिकाणी योगासने करायची आहेत, तिथले वातावरण अत्यंत शुद्ध असावे आणि बाहेरून ताजी हवेचा प्रवेश असावा हेही लक्षात ठेवा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात