JOIN US
मराठी बातम्या / अध्यात्म / महिन्याच्या अखेरीस शुक्राचे संक्रमण, या 3 राशींना आर्थिक क्षेत्रात राहावे लागेल सावध

महिन्याच्या अखेरीस शुक्राचे संक्रमण, या 3 राशींना आर्थिक क्षेत्रात राहावे लागेल सावध

शुक्राच्या संक्रमणादरम्यान वृषभ राशीच्या लोकांनी सतर्क राहण्याची गरज आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 18 मे: ज्योतिषशास्त्र सांगते की शुक्र हा आकर्षण, ऐश्वर्य, सौभाग्य, संपत्ती, प्रेम आणि वैभवाचा कारक आहे. जेव्हा शुक्र कुंडलीत मजबूत स्थितीत असतो तेव्हा व्यक्तीला या सर्व क्षेत्रांमध्ये त्याचे फायदे मिळतात. पण काही राशींना शुक्राच्या अशुभ प्रभावांना राशीचक्र बदल आणि उदय आणि अस्त या स्थितीतही सामोरे जावे लागते. वैदिक पंचागानुसार, 30 मे रोजी संध्याकाळी 07:51 वाजता शुक्र कर्क राशीत प्रवेश करेल आणि 7 जुलैपर्यंत या राशीत राहील. तो सध्या मिथुन राशीत बसला आहे. या राशी बदलाचा सर्व राशींवर परिणाम होईल, पण 3 राशी आहेत, ज्यांना या काळात आर्थिक क्षेत्रात सावध राहण्याची गरज आहे.

वृषभ शुक्राच्या संक्रमणादरम्यान वृषभ राशीच्या लोकांनी सतर्क राहण्याची गरज आहे. यादरम्यान मित्रांसोबत मतभेद होऊ शकतात. यासोबतच आर्थिक क्षेत्रातही सावध राहण्याची गरज आहे. खर्च करताना गरजा लक्षात ठेवा. जोडीदारासोबतच्या नात्यात चढ-उतार येऊ शकतात. Vastu Tips In Marathi: घरात लावा हे झाड, तिजोरी राहील नेहमी भरलेली सिंह कर्क राशीत शुक्राच्या संक्रमणामुळे खिशावरचा भार वाढू शकतो. तसेच या काळात आळसामुळे कामावर परिणाम होऊ शकतो. वादविवादापासून दूर राहा आणि आरोग्याची विशेष काळजी घ्या. कारण या काळात डोळा आणि सर्दीची समस्या तुम्हाला सतावू शकतात. चुकूनही घरात लावू नका ही 5 झाडे, नशिबावर होतो दुष्परिणाम, हे आहे कार धनु धनु राशीच्या लोकांना शुक्राच्या संक्रमणादरम्यान काळजी घ्यावी लागेल. तसेच, या काळात आर्थिक बाबतीत विचारपूर्वक निर्णय घ्या. पैशाच्या खर्चावरही अंकुश ठेवावा लागेल. कामाच्या ठिकाणी असभ्य वर्तनामुळे काही अडचणी येऊ शकतात. यासोबतच कौटुंबिक जीवनात तणाव वाढू शकतो. (सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या