JOIN US
मराठी बातम्या / अध्यात्म / Wardha News: महाराष्ट्रातलं असं मंदिर पाहिलं नसेल, इथं जगभरातून पर्यटक येतात! VIDEO

Wardha News: महाराष्ट्रातलं असं मंदिर पाहिलं नसेल, इथं जगभरातून पर्यटक येतात! VIDEO

वर्ध्यातील गीताई मंदिराला देश-विदेशातून पर्यटक भेट देतात. येथे विनोबा भावे यांचा संपूर्ण ग्रंथच शिलाखंडांवर कोरण्यात आला आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

अमिता शिंदे, प्रतिनिधी वर्धा, 17 मे: आपण दगडांवर कोरून लिहलेले प्राचीन शिलालेख पाहिले असतील. एखादा संपूर्ण ग्रंथच शिलाखंडावर कोरला असं कुणी सांगितलं तर आपला विश्वास बसणार नाही. पण वर्ध्यातील गोपुरीच्या गीताई मंदिरा परिसरात ही किमया केली आहे. विनोबा भावे यांचा ‘गीताई’ हा 18 अध्यायांचा ग्रंथच शिळांवर कोरण्यात आला आहे. विशेष म्हणजे हे ठिकाण पर्यटकांचं आकर्षण केंद्र ठरत असून भारतासह विदेशी पर्यटकही मोठ्या संख्येने इथं भेट देत असतात. 1977 पासून निर्माण कार्य वर्ध्यातील गोपुरी परिसरातील निर्माण कार्य 1977 पासून सुरू झालं. गीताई या ग्रंथाचे संपूर्ण 18 अध्याय या ठिकाणी शिलाखंडांवर कोरण्यात आले आहेत. एक अध्याय काळ्या तर दुसरा लाल शिळांवर कोरला आहे. तसेच या शिलालेखांची रचनाही आकर्षक करण्यात आली आहे. त्यामुळे गीताई मंदिराला भेट देणारे पर्यटक हे गीताईचे अध्यायही आवर्जून वाचतात.

देशातील पहिलीच योजना वर्ध्यात प्रत्यक्षात आलेली ही देशातील पहिलीच परियोजना असल्यास सांगितलं जातं. ज्यात एक संपूर्ण मराठी ग्रंथ शिळांवर कोरलाय. हे शिलाखंड भारतातील वेगवेगळ्या ठिकाणाहून आणल्या गेले आहेत. मंदिरातील प्रयुक्त दगड हे संपूर्ण भारताच्या दृढ एकतेचे प्रतीक आहे. वृद्धांसह चिमुकले ही नेहमी या ठिकाणी कोरलेले अध्याय वाचनास किंवा विरंगुळासाठी भेटी देत असतात. हे ठिकाण म्हणजे वर्धातील प्रसिद्ध पर्यटन स्थळांपैकी एक बनले आहे. गीताई म्हणजे नेमकं काय? गीताई हे आचार्य विनोबा भावे यांनी भगवत गीताचे मराठीत केलेले ओवीबद्ध भाषांतरण होय. गीतेतील श्लोकांच्या अर्थांचा आशय न बदलता त्यातील श्लोकांचे भाषांतरण किंवा सम श्लोकी रचना आचार्य विनोबा भावे यांनी केली. हे लेखन विनोबा भावे यांनी 1932 साली केले आहे. गीताई एक पवित्र ग्रंथ आहे. भारतीय परंपरेनुसार धार्मिक आणि पूजन्य ग्रंथाला ठावणीवर ठेवून त्याचे पठण केले जाते. 112 वर्षांपासून सुरू आहे ‘हे’ मशिन, शाहू महाराजांशी आहे जवळचं कनेक्शन, Video कसे आहेत शिलाखंड? या शिळांचा आकार ठरवताना त्यावर हवा, पाणी, उष्णता इत्यादी परिणामांचा विचार केला गेला आहे. त्यामुळे प्रत्येक शीला खंडांची उंची 9 फूट रुंदी 2 फूट आणि जाडी जवळजवळ 1 फूट दिसते. या शिळा दोन फूट जमिनीत काँक्रीट मध्ये पुरल्या आहेत. जेणेकरून त्या मजबुतीसह दीर्घकाळापर्यंत उभा राहतील. विशेष म्हणजे या शिलाखंडांना अशा पद्धतीने लावण्यात आलं आहे की समोर चरखा आणि मागच्या बाजूने गाईचं प्रतीकात्मक रूप निर्मित झालं आहे. चरखा महात्मा गांधी आणि गाय जमनालाल बजाज यांच्या स्मृतीचं प्रतीक आहे. कुठून आणल्या शिळा ? पूर्वेकडील उत्तर प्रदेशातील चुनार, पश्चिमेकडून महाराष्ट्रातील कोल्हापूर, उत्तरेकडून मध्य प्रदेशातील कुरोली, तसेच राजस्थानातील बुंदी आणि दक्षिणेमध्ये कुपम आंध्र प्रदेश तथा कर्नाटक, तामिळनाडू आणि आंध्रातील विविध ठिकाणाहून हे शिलाखंड आणण्यात आले आहेत. प्रत्येक शिळेच्या मध्ये 3 इंच अंतर ठेवण्यात आले आहे. जेणेकरून आत मध्ये हवा खेळती राहील. अयोध्येतून मोठी बातमी, राम मंदिराचं छत तयार, खास दगड वापरला, स्पेशल PHOTOS शिळांवरील लिखावट शिळांवर लिखावट जमिनीपासून पाच ते सहा फूट वर एका भागात केली गेली आहे. जेणेकरून योग्य दृष्टी स्तरावर असेल आणि वाचण्यास असुविधा होणार नाही. अक्षरांचा आकार देखील या आधारे निर्धारित केला गेला आहे की त्याला आठ ते दहा फुटाच्या अंतरावरूनही वाचले जाऊ शकेल.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या