मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /112 वर्षांपासून सुरू आहे ‘हे’ मशिन, शाहू महाराजांशी आहे जवळचं कनेक्शन, Video

112 वर्षांपासून सुरू आहे ‘हे’ मशिन, शाहू महाराजांशी आहे जवळचं कनेक्शन, Video

X
कालची

कालची वस्तू आज जुनी होणाऱ्या सध्याच्या काळात कोल्हापुरात मात्र 112 वर्ष जुनं सोडा मशिन व्यवस्थित सुरू आहे.

कालची वस्तू आज जुनी होणाऱ्या सध्याच्या काळात कोल्हापुरात मात्र 112 वर्ष जुनं सोडा मशिन व्यवस्थित सुरू आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Kolhapur, India

साईप्रसाद महेंद्रकर, प्रतिनिधी

कोल्हापूर 16 मे :  महाराष्ट्रातील  प्रमुख ऐतिहासिक शहरामध्ये कोल्हापूरचा समावेश होतो. या शहरातील अनेक वास्तू ऐतिहासिक आहेत. अनेक परंपराही या शहरानं आजही जपल्या आहेत. रोज बदलणाऱ्या जगात कोल्हापूरमधील एक सोडा मशीन तब्बल 112 वर्ष जुनं आहे. राजर्षी शाहू महाराजांनी उद्घाटन केलेलं हे मशिन आजही सुरू असून त्यामधील सोडा ग्राहकांना दिला जातो.

दिग्गजांची पसंती

कोल्हापूर शहरातील भाऊसिंगजी रोडवर हे इम्पेरिअल कोल्ड्रिंक्स हाऊस दुकान आहे. 10 ऑक्टोबर 1910 साली दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर खुद्द राजर्षी शाहू महाराजांच्या हस्ते या दुकानाचे उद्घाटन करण्यात आले होते. दसऱ्याचा शाही सीमोल्लंघनाचा कार्यक्रम पार पाडून परत राजवाड्यावर जाताना महाराजांनी इथे थांबून हे उद्घाटन केले होते. तेव्हापासून आजतागायत या दुकानात ग्राहकांची गर्दी असते. सध्या हे दुकान गवळी परिवारातील चौथी पिढी म्हणजेच ऋषिकेश शिंदे-गवळी हा तरुण चालवत आहेत.

करवीर निवासिनी अंबाबाई मंदिरापासून अगदी जवळच हे कोल्ड्रिंक हाऊस आहे.  या दुकानाबरोबरच राजारामपुरीमध्येही या कोल्ड्रिंक्स हाऊसची शाखा आहे. 'येथील स्पेशल आईस्क्रीम चाखण्यासाठी आणि येथील सोडा पिण्यासाठी कित्येक मराठी-हिंदी चित्रपटसृष्टीतील कलाकार, दिग्गज क्रिकेटर, राजकीय नेतेमंडळी  येत असतात. आईस्क्रिमची चव ही सारखीच ठेवल्यामुळे पिढ्यानपिढ्या म्हणजेच पणजोबा-आजोबा-वडील-मुलगा अशा प्रकारे या दुकानात येणारे देखील बरेचजण असल्याचे ऋषिकेश सांगतो.

सोडा मशिनचा इतिहास

या दुकानातील सोडा मशिनची गोष्टही रंजक आहे.  ऋषिकेश गवळी याचे पणजोबा हे शाहू महाराजांच्या जवळचे होते. त्यामुळे ते महाराजांसोबत  फिरतीवर असतं. त्यांनी 1905 साली अमेरिका दौऱ्यात सोडा फाऊंटनचं हे मशीन पाहिलं. सहसा बारमध्ये वापरल्या जाणाऱ्या या मशिनचा वेगळ्या पद्धतीनं वापर करता येईल, हे त्यांच्या लक्षात आलं. त्यानंतर 1910 साली 76 रुपयांना त्यांनी हे मशिन खरेदी केलं.

शेतकऱ्याचा नादच खुळा! शेतातच कापला केक आणि भरवला पिकाला, पाहा काय आहे कारण Video

शिकागो मध्ये तयार झालेले हे मशीन स्टॅनले क्नाईट या कंपनीचे आहे. हे पूर्णतः स्वयंचलित मशीन आहे. या मशीनमध्ये 3 वॉश बेसिन, 2 डस्ट बिन आणि खालच्या बाजूला मोटर बसवलेली आहे. पंपिंग सिस्टीम वर या मशीनमध्ये सॉफ्ट ड्रिंक्स बनवल्या जातात. आपल्याला हवा तो फ्लेवर एकदा पंप केला की, 30 मिली आणि दोनदा पंप केला की, 60 मिली फ्लेवर मिळतो. त्यामध्ये फ्रेश सोडा किंवा गार पाणी वापरून सॉफ्ट ड्रिंक बनवता येते.

या दुकानात प्लेन सोडा आणि विविध फ्लेवरचे सोडा, आईस्क्रीम बॉल, कोन आईस्क्रीम, आईस्क्रीम स्कूप, फ्लेवर्स आणि जेली, संडे आईस्क्रीम, फ्लोट आईस्क्रीम, मिल्क शेक, लस्सी, ज्यूस आणि बेल्जियम चॉकलेट क्रश यामधले विविध प्रकार मिळतात. 10 ते 120 रुपये अशी या पदार्थांची किंमत आहे.

भाऊसिंगजी रोडवरील लहानशा कोल्ड्रिंक्स हाऊसमध्ये ग्राहकांना भिंतीवर लावलेली जुनी ब्लॅक अँड व्हाईट चित्रे, आईस्क्रीम बद्दलचे कोट्स फ्रेम करून लावलेले पाहायला मिळतात. यासोबतच कडक उन्हात कित्येक वर्षे जुन्या अशा सोडा मशीनचा सोडा प्यायला येथे ग्राहक गर्दी करत असतात.

पंचाहत्तरीत लग्न केलेल्या आजी-आजोबांचा कसा सुरुय संसार? पाहा स्पेशल रिपोर्ट

अभिनेत्री रेखाचे पोस्टर आकर्षण

या दुकानातील अभिनेत्री रेखाचे पोस्टर हे येथील खास आकर्षण आहे.  रेखाने एकदा सिंगापूरमधील साडीच्या दुकानाची जाहिरात केली होती. त्या जाहिरातीचे कॅलेंडर पोस्टर गवळी यांना मिळाले होते. त्यावेळी गाजलेल्या जाहिरातीमधील हे पोस्टर गवळी यांनी फ्रेम करुन दुकानात लावले. या पोस्टरवर रेखानं सहीही केलीय.

कोल्ड्रिंक हाऊसचा पत्ता

इम्पेरिअल कोल्ड्रिंक्स हाऊस, छत्रपती शिवाजी महाराज चौक, भाऊसिंगजी रोड, सी वॉर्ड, कोल्हापूर - 416002

संपर्क (ऋषिकेश शिंदे-गवळी) : 099211 11107

First published:
top videos

    Tags: Kolhapur, Local18