वर्धा, 22 जुलै: महाराष्ट्रात अनेक ठिकाणी ऐतिहासिक महत्त्व असणारी मंदिरे आहेत. वर्धा जिल्हा हा महात्मा गांधी आणि आचार्य विनोबा भावे यांची कर्मभूमी म्हणून प्रसिद्ध आहे. येथील शेकडो वर्षांचे लक्ष्मीनारायण मंदिर अनेक ऐतिहासिक घटनांची साक्ष देत आहे. 1905 मध्ये बांधलेले हे मंदिर जमनालाल बजाज यांनी हरिजनांसाठी खुले केले. तर महात्मा गांधी यांनी ‘छोडो भारत’ आंदोलनापूर्वी या मंदिरात दर्शन घेतल्यांचं सांगितलं जातं. जमनालाल बजाज यांनी हरिजनांसाठी केलं खुलं वर्धा येथील लक्ष्मीनारायण मंदिराला 100 पेक्षा जास्त वर्षांची परंपरा आहे. मंदिराची बांधणी 1905 मध्ये करण्यात आली होती. जमनालाल बजाज यांनी हे मंदिर हरिजनांसाठी खुले केले. मंदिराची भव्यता त्याच्या क्लिष्ट कोरीव काम, उत्कृष्ट शिल्पे आणि त्याच्या भिंती आणि खांबांना सजवणाऱ्या दोलायमान कलाकृतींमध्ये आहे. मंदिराचा प्रत्येक तपशील त्याच्या निर्मितीमध्ये आलेली कुशल कारागिरी आणि भक्ती प्रतिबिंबित करतो, असे मंदिराचे सचिव अंबिका प्रसाद तिवारी यांनी सांगितले.
गांधीजी ही या ठिकाणी झाले होते नतमस्तक भारत छोडो आंदोलनासाठी रवाना होत असताना राष्ट्रपिता महात्मा गांधीजी हे या लक्ष्मीनारायण मंदिरातील लक्ष्मीनारायणाचे चरणी नतमस्तक झाले होते. त्यानंतर ते मुंबईकरिता रवाना झाले. भगवान विष्णू आणि महालक्ष्मीचे हे मंदिर आतील बाजूने पूर्ण संगमरवरी आहे. ते समृद्ध धार्मिक वारशाचा एक भव्य पुरावा आहे. भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मी यांना समर्पित हे मंदिर भक्तांसाठी पूजनीय आहे आणि त्याच्या वास्तू वैभवासाठी अभ्यागतांकडून त्याची प्रशंसा केली जाते, असे तिवारी सांगतात. खादीचं वस्त्र आणि गोरसाचा नैवद्य लक्ष्मी नारायण मंदिरात काही विशेष परंपरा आहेत. येथील मूर्तींना खादीचे वस्त्र परिधान केली जातात. तसेच महापूजेनंतर गोरसाचा म्हणजेच गाईच्या दुधापासून बनवलेल्या वस्तूंचा नैवद्य अर्पण केला जातो. महात्मा गांधी यांच्या काळापासून असणारा हा वारसा आजही कायम असल्याचे तिवारी सांगतात. विनोबा भावे यांना सापडलेल्या मूर्ती तुम्ही कधी पाहिल्या आहेत का? विदेशी पर्यटकही देतात भेटी वर्धा जिल्ह्यात सेवाग्राम येथील बापू कुटी, पवनार येथील आचार्य विनोबा भावे यांचे ऐतिहासिक महत्त्व आहे. हे आश्रम, नदीतील समाधी या ठिकाणी मोठ्या संख्येने पर्यटक, अभ्यासक भेटी देत असतात. त्याचबरोबरीने जमनालाल बजाज यांच्या काळात सुरू झालेल्या लक्ष्मीनारायण मंदिराला देखील ऐतिहासिक महत्त्व प्राप्त झाले आहे. या ठिकाणी देखील देशविदेशातील पर्यटक भेट देत असतात.