केशर घालून बनवलेल्या तांदळाच्या खिरीचा महादेवांना आणि पार्वती मातेला नैवेद्य दाखवावा.
सर्वेश श्रीवास्तव, प्रतिनिधी अयोध्या, 20 जुलै : असं म्हणतात की, श्रावणात महादेवांची मनोभावे पूजा केल्यास आपल्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात. त्यामुळे श्रावण सुरू झाल्यापासून शिवमंदिरात भाविकांची आधीपेक्षा अधिक गर्दी पाहायला मिळते. मात्र तुम्हाला माहितीये का, आपल्या आयुष्यात असलेली विशिष्ट अडचण दूर करण्यासाठी महादेवांची पूजा करण्याची एक विशेष पद्धत असते. अयोध्येचे प्रसिद्ध ज्योतिषी पंडित कल्की राम यांनी सांगितलं की, श्रावणात भक्त महादेवांना प्रसन्न करण्यासाठी विविध उपाय करतात. मात्र याच महिन्यात महादेवांची काही विशिष्ट पद्धतींनी पूजा केली, तर आपल्या आयुष्यातील सर्व आर्थिक अडचणी दूर होतात. शिवाय वैवाहिक जीवनातील समस्यांपासूनही मुक्ती मिळते. आजारपणही दूर पळून जातं. त्यामुळे आता ज्योतिषांनी दिलेली माहिती सविस्तरपणे जाणून घेऊया…
दर श्रावण सोमवारी महादेवांना अभिषेक करा. असं केल्यास सर्व आर्थिक समस्यांपासून मुक्ती मिळेल. पर्यायाने आपल्याला समाधानी आयुष्य जगात येईल. ट्रान्सफॉर्मरचा स्फोट, 16 जणांचा मृत्यू! हृदयद्रावक घटनेचा VIDEO आला समोर
आपण किंवा आपल्या कुटुंबातील एखादा सदस्य आजारी असल्यास आपण प्रत्येक श्रावण सोमवारी शिवमंदिरात रुद्राभिषेक करावा. त्याचवेळी मंदिरात तुपाचा दिवाही लावावा. शिवाय केशर घालून बनवलेल्या तांदळाच्या खिरीचा महादेवांना आणि पार्वती मातेला नैवेद्य दाखवावा.
आपला पगार वाढावा किंवा व्यवसायात अधिक नफा मिळावा, अशी इच्छा असेल, तर आपण श्रावणात चांदीच्या जोडव्या किंवा पैंजण पार्वती मातेला अर्पण करावे. शिवाय केशर घातलेल्या खिरीचा नैवेद्यही दाखवावा.
श्रावणात नवरा-बायकोने एकत्र महादेवांना पंचामृताचा अभिषेक करावा. असं केल्यास आपल्यातलं प्रेम वाढेल आणि वैवाहिक जीवनात सारंकाही आलबेल घडेल. (सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)