नोव्हेंबर महिन्यातील सण-उत्सव
मुंबई, 30 ऑक्टोबर : इंग्रजी कॅलेंडरचा 11 वा महिना नोव्हेंबर, मंगळवार, 01 नोव्हेंबरपासून सुरू होत आहे. या दिवशी मासिक दुर्गाष्टमी आहे. प्रबोधिनी एकादशी, चातुर्मासाची सांगता, तुळशी विवाह , शनि प्रदोष व्रत, देव दीपावली , कार्तिक पौर्णिमा, गुरुनानक जयंती, गणाधिप संकष्टी चतुर्थी, उत्पत्ती एकादशी, विवाह पंचमी, चंपा षष्ठी, विनायक चतुर्थी यासारखे महत्त्वाचे व्रत आणि सण नोव्हेंबरमध्ये येणार आहेत. वर्षातील शेवटचे चंद्रग्रहणही याच महिन्यात होणार आहे. या महिन्यात वृश्चिक संक्रांती आहे म्हणजेच सूर्य देखील वृश्चिक राशीत प्रवेश करणार आहे. सूर्याचा हा राशी बदल अनेक लोकांसाठी सकारात्मक बदल ठरू शकतो. तिरुपतीचे ज्योतिषी डॉ. कृष्णकुमार भार्गव यांच्याकडून नोव्हेंबर महिन्यातील व्रत आणि सण कोणत्या दिवशी येणार आहेत, याविषयी जाणून घेऊया. नोव्हेंबर 2022 उपवास आणि सण - 01 नोव्हेंबर, मंगळवार: गोपाष्टमी, मासिक दुर्गाष्टमी 02 नोव्हेंबर, बुधवार: अक्षय कुष्मांड नवमी 03 नोव्हेंबर, गुरुवार: कंस वध, विठ्ठल नवरात्रारंभ 04 नोव्हेंबर, शुक्रवार: प्रबोधिनी एकादशी 05 नोव्हेंबर, शनिवार: तुळशी विवाह, शनि प्रदोष व्रत, चातुर्मासाची समाप्ती 06 नोव्हेंबर, रविवार: वैकुंठ चतुर्दशी उपवास (मध्यरात्री विष्णू पूजन करणे शुभ) 07 नोव्हेंबर, सोमवार: देव दीपावली, कार्तिक त्रिपुरारी पौर्णिमा 08 नोव्हेंबर, मंगळवार: चंद्रग्रहण, गुरुनानक जयंती, तुलसी विवाह समाप्ती 11 नोव्हेंबर, शुक्रवार: सौभाग्य सुंदरी व्रत 12 नोव्हेंबर, शनिवार: गणाधिप संकष्टी चतुर्थी 16 नोव्हेंबर बुधवार: कालभैरव जयंती, वृश्चिक संक्रांती 20 नोव्हेंबर, रविवार: उत्पत्ती एकादशी 21 नोव्हेंबर, सोमवार: सोम प्रदोष व्रत 22 नोव्हेंबर, मंगळवार: मासिक शिवरात्री
23 नोव्हेंबर, बुधवार: दर्श अमावस्या 27 नोव्हेंबर, रविवार: विनायक चतुर्थी 28 नोव्हेंबर, सोमवार: विवाह पंचमी 29 नोव्हेंबर, मंगळवार: चंपाषष्ठी हे वाचा - संध्याकाळच्या पूजेसाठी दिवा लावताना या एका मंत्राचा करा जप; वाढेल धन-संपत्ती तुळशी विवाहाला चातुर्मास संपतो - प्रबोधिनी एकादशी 04 नोव्हेंबरला आहे. या दिवशी भगवान विष्णू चार महिन्यांच्या योगनिद्रेतून बाहेर पडतील, त्यासोबत तुळशी विवाहा दिवशी चातुर्मासाची समाप्ती होईल. या दिवसापासून भगवान विष्णू पुन्हा भगवान शिवाकडून विश्वाच्या संचालनाची जबाबदारी घेतील. चार महिन्यांपासून मांगलिक कामांवर असलेले निर्बंधही आता संपणार आहेत. प्रबोधिनी एकादशीच्या दिवसापासून लग्न, मुंडण, गृहप्रवेश, लग्न इत्यादी शुभ कार्यांसाठी शुभ मुहूर्त उपलब्ध होतील. (सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)