कोणत्या रंगाचे कपडे परिधान करावेत?
मुंबई, 7 मार्च: वाईटावर चांगल्याचा विजय म्हणून साजरा केला जाणारा होळी/धूलिवंदन हा सण धार्मिक दृष्टिकोनातून अतिशय शुभ मानला जातो. धूलिवंदनाचे रंग खेळण्याच्या एक दिवस आधी होलिका दहनाची परंपरा आहे. फाल्गुन महिन्यातील पौर्णिमेला येणारी ही तिथी यावेळी 07 मार्च 2023 रोजी येत आहे. धूलिवंदनाशी संबंधित असे अनेक नियम आहेत ज्यांचे पालन करणे अत्यंत महत्त्वाचे मानले जाते, विशेषतः नवविवाहितांनी हे नियम पाळले पाहिजेत. नुकतेच लग्न झालेल्या मुलींनी होलिका दहनाच्या आगीकडे पाहू नये असे मानले जाते. याशिवाय अनेक नियम आहेत ज्यांचे पालन केले पाहिजे. ते नियम काय आहेत ते जाणून घेऊया. धूलिवंदनाच्या दिवशी करा वास्तूचे हे 5 उपाय, वर्षभरा घरात टिकून राहील समृद्धी कोणत्या रंगाचे कपडे परिधान करावेत? धूलिवंदनाच्या दिवशी नववधूंनी काळे कपडे घालणे टाळावे, कारण ते अशुभ मानले जाते. असे मानले जाते की काळा रंग नकारात्मक ऊर्जा अधिक आकर्षित करतो, कारण होलाष्टकच्या दिवशी नकारात्मक शक्तींचा प्रभाव अधिक असतो, म्हणून हा रंग परिधान करणे टाळावे. याशिवाय लग्नानंतरची पहिली धूळवड असणाऱ्या महिलांनी पांढरे कपडे घालू नयेत. त्याऐवजी नवीन वधू पिवळा किंवा लाल रंग परिधान करू शकते.
सासरच्या घरी होळी साजरी करू नका धार्मिक मान्यतेनुसार लग्नानंतरची पहिली होळी नवविवाहितांनी सासरच्या घरी साजरी करू नये. असे मानले जाते की याचा परिणाम घरातील सुख-शांतीवर होतो. नवविवाहित जोडप्यासाठी सासरच्या घरी पहिली धूळवड खेळणे अशुभ मानले जाते. असे केल्याने तुमचे नातेही बिघडू शकते, याशिवाय तुमच्यासोबत आणि तुमच्या जोडीदारासोबत काही अशुभही घडू शकते. होळी, धुळवड आणि धूलिवंदन यामध्ये काय आहे फरक? कोणत्या दिवशी खेळावा रंग लग्नाचे सामान कोणालाही देऊ नका नुकतेच लग्न झालेल्या महिलांनी लग्नात मिळालेल्या वस्तू कोणालाही दान करू नयेत. असे मानले जाते की होलिकेच्या दिवशी वाईट प्रभाव अधिक असतो आणि वस्तू देण्याने त्याचा विपरीत परिणाम होतो. (सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)