मुंबई, 7 मार्च: हिंदू कॅलेंडरनुसार, होळीचा सण दरवर्षी फाल्गुन महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेला साजरा केला जातो. होळी, धूलिवंदन हा सण वाईटावर चांगल्याच्या विजयाचे प्रतीक मानला जातो. या दिवशी लोक एकमेकांना रंग लावून आणि त्यांच्या तक्रारी विसरून, गळाभेट घेऊन आनंद साजरा करतात. धूलिवंदनाच्या एक दिवस आधी होलिका दहन केले जाते, यावेळी सर्व प्रकारचे वाईट आणि नकारात्मकता मनातून काढून टाकली जाते.
ज्योतिषांच्या मते, धूलिवंदनाच्या दिवशी वास्तुशी संबंधित काही उपाय केल्यास ते खूप फायदेशीर ठरतात. जाणून घ्या धूलिवंदनाच्या दिवशी करावयाचे असे काही वास्तु उपाय, ज्यामुळे वर्षभर घरात सुख-समृद्धी राहील. श्रीकृष्णाच्या मुकुटात विराजमान असलेले मोरपीस घरात ठेवावे की ठेवू नये ? वास्तु उपाय धूलिवंदनाच्या एक दिवस आधी होलिका दहन केले जाते. धार्मिक मान्यतेनुसार, धूलिवंदनाच्या दिवशी घराच्या प्रत्येक भागात होलिका दहनाची राख शिंपडल्यास सर्व प्रकारचे अडथळे आणि नकारात्मक ऊर्जा नष्ट होते आणि घरात सुख-शांती नांदते. होळी, धुळवड आणि धूलिवंदन यामध्ये काय आहे फरक? कोणत्या दिवशी खेळावा रंग धूलिवंदनाच्या दिवशी सर्व प्रथम देवता आणि आपल्या कुलदैवतांचे स्मरण करा आणि घराच्या भिंतीवर भगवान श्रीकृष्ण आणि राधा यांचे चित्र लावा. त्यांचे चित्र बेडरूममध्ये लावणे अधिक शुभ असते. फोटो लावण्यापूर्वी राधा-कृष्णाच्या चित्राची पूजा करून त्यावर फुले व गुलाल अर्पण करावा. यामुळे घराची वास्तू समस्या दूर होते. होळीच्या दिवशी आणि येणाऱ्या काळात तुम्हाला प्रत्येक कामात यश मिळवायचे असेल आणि तुमचा मान-सन्मान वाढवायचा असेल तर उगवत्या सूर्याचे चित्र घर किंवा कामाच्या ठिकाणी पूर्व दिशेला लावा. असे केल्याने तुमच्या कामात गती येईल आणि अडथळे दूर होतील. Money Plant: तुमचाही खिसा रिकामा असतो? मग घरात लावा पैसा आकर्षित करणारं हे झाड वास्तूनुसार, वनस्पती ऊर्जा आणि समृद्धी आणतात. अशा परिस्थितीत होळीच्या दिवशी घरात काही रोपे लावा. तुम्ही तुमच्या सोयीनुसार तुळशी, मनी प्लांट आणि इतर कोणतेही रोप लावू शकता. जर तुमच्या घराच्या शिखरावर ध्वज असेल तर होळीच्या दिवशी तो नक्कीच बदला. या उपायाने घरात सुख, समृद्धी आणि ऐश्वर्य प्राप्त होते. तसेच घरात पसरलेली नकारात्मक ऊर्जा नष्ट होईल. (सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)