JOIN US
मराठी बातम्या / अध्यात्म / Pune : घरासाठी घेतलेल्या जागेवर का उभे राहिले सारसबागेचे महालक्ष्मी मंदिर? Video

Pune : घरासाठी घेतलेल्या जागेवर का उभे राहिले सारसबागेचे महालक्ष्मी मंदिर? Video

Shri Mahalaxmi Mandir Pune: सारसबागेच्या समोरील ज्या जागेवर महालक्ष्मी मंदिर उभारण्यात आले आहे. त्या जागेवर घर बांधण्यात येणार होते.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

पुणे, 4 ऑक्टोबर : पुणे शहराला ऐतिहासिक आणि धार्मिक मोठा वारसा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी वास्तव्य केलेल्या, पेशवाईची राजधानी असलेल्या पुणे शहरात अनेक ऐतिहासिक वास्तू आणि मंदिरं आहेत. बदलत्या काळात शहराच्या संस्कृतीमध्ये नव्या मंदिरांनीही भर टाकली आहे. परंपरा आणि आधुनिकता यांचा संगम असलेल्या पुणे शहरातील मंदिरांध्ये सारसबागेच्या समोरील महालक्ष्मी मंदिराचा प्रमुख समावेश होतो. महालक्ष्मीच्या या मंदिरात भाविकांची नेहमी गर्दी असते. मंदिराचा इतिहास पुण्यातील सारसबाग येथे महालक्ष्मीचे मंदिर अतिशय प्रसिद्ध आहे. हे मंदिर हे खाजगी मालिकेच्या असून अग्रवाल कुटुंबाकडे याची  मालकी आहे. या मंदिराची स्थापना 1984 साली झाली. तर मंदिराचे बांधकाम 1972 पासून सलग 12 वर्ष सुरू होते. जवळजवळ बारा वर्ष हे बांधकाम काम सुरू होते. संगमरवरामध्ये मंदिराचे काम झाले आहे. मंदिरामध्ये असलेली महालक्ष्मीची मूर्ती ही राजस्थानामध्ये बनवली आहे. ही मूर्ती बनवायला देखील बारा वर्षांचा कालावधी लागला. घरासाठी घेतली होती जागा… सारसबागेच्या समोरील ज्या जागेवर महालक्ष्मी मंदिर उभारण्यात आले आहे, ती जागा बन्सीलाल अग्रवाल यांनी घर बांधण्यासाठी घेतली होती. पण, तिथं आपले घर न बांधता देवाचे घर बनवावे. सर्वांना त्याचा लाभ घेता यावा, असे अग्रवाल यांना वाटले. त्यामुळे त्यांनी या मंदिराची उभारणी करण्याचे ठरवले, अशी माहिती मंदिराच्या विश्वस्त अमिता अग्रवाल यांनी दिली आहे. चतु:श्रुंगी मंदिराचा इतिहास माहिती आहे? स्वातंत्र्य चळवळीशीही होता संबंध, Video या मंदिरामध्ये महालक्ष्मी, सरस्वती आणि कालीमातेच्या मूर्ती आहेत. माणसाला बुद्धी असेल तर त्या बुद्धीच्या जोरावर तो संपत्ती म्हणजेच लक्ष्मी कमावू शकतो. बुद्धी आणि लक्ष्मी असेल तर शक्तीही मिळते, या उद्देशानं आम्ही या मंदिरात या तीन देवींची स्थापना केली आहे, असे अग्रवाल यांनी स्पष्ट केले. मंदिराची वेळ महालक्ष्मीचे मंदिर रोज सकाळी सहा ते दुपारी एक आणि दुपारी चार ते रात्री दहा वाजेपर्यंत भक्तांसाठी खुले असते.  दिवसातून दोन वेळा मंदिरात देवीची आरती होते. सकाळी साडेसातला पहिली आरती होते. तर रात्री साडेनऊ वाजता शेजारती होते. Video : एकाच गावात तीन वेगवेगळ्या देवीचं रुप, नवस फेडण्याचीही अनोखी प्रथा मंदिरामध्ये देवीला वर्षातून दोन वेळा सोन्याची साडी नेसवली जाती. दसरा आणि दिवाळी पाडवा या दिवशी देवीला सोन्याची साडी नेसवली जाते. वर्षभरातील वेगवेगळे सण मंदिरामध्ये मोठ्या उत्साहात साजरे केले जातात. Shri Mahalaxmi Mandir, Pune गूगल मॅपवरून साभार

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या