मराठी बातम्या /बातम्या /religion /

Pune : चतु:श्रुंगी मंदिराचा इतिहास माहिती आहे? स्वातंत्र्य चळवळीशीही होता संबंध, Video

Pune : चतु:श्रुंगी मंदिराचा इतिहास माहिती आहे? स्वातंत्र्य चळवळीशीही होता संबंध, Video

Navratri : पुण्यातील प्रसिद्ध चतु:श्रुंगी मंदिराचा स्वातंत्र्य चळवळीशी देखील जवळचा संबंध होता, हे तुम्हाला माहिती आहे का?

Navratri : पुण्यातील प्रसिद्ध चतु:श्रुंगी मंदिराचा स्वातंत्र्य चळवळीशी देखील जवळचा संबंध होता, हे तुम्हाला माहिती आहे का?

Navratri : पुण्यातील प्रसिद्ध चतु:श्रुंगी मंदिराचा स्वातंत्र्य चळवळीशी देखील जवळचा संबंध होता, हे तुम्हाला माहिती आहे का?

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Pune, India

पुणे, 28 सप्टेंबर :  नवरात्रोत्सवाला सोमवारी मोठ्या जल्लोषात आणि भक्तीमय वातावरणार प्रारंभ झाला. नवरात्र उत्सव सध्या धुमधडाक्यात सर्वत्र सुरू आहे. पुण्यातही जसा गणेशोत्सव साजरा केला जातो त्याच उत्साहात नवरात्रोत्सव देखील साजरा केला जात आहे. पुण्यातील अतिशय जागृत देवस्थान म्हणून पुणे शहराच्या वायव्य भागामध्ये असलेल्या चतु:श्रृंगी देवीच्या मंदिरात नवरात्रोत्सवानिमित्त भाविकांची दर्शनासाठी मोठी गर्दी पाहिला मिळत आहे. याच नवरात्रोत्सवानिमित्त पुण्यातील चतु:श्रृंगी मंदिराचा काय आहे इतिहास? चतु:श्रृंगी देवीलाचतु:श्रृंगी हे नाव कसे पडले? स्वातंत्र्य चळवळीशी या मंदिराचा संबंध काय आहे ? हे पाहूया

काय आहे इतिहास?

 इ.स. 18 शतकात पुण्यात पेशव्याची सत्ता होती. दुर्लभशेठ महाजन नावाचे एक पेशव्यांचे सावकार होते. दुर्लभशेठ वणीच्या सप्तशृंगी देवीचे परमभक्त होते. जास्त वय झाल्यामुळे त्यांना वणी येथे जाणे अशक्य झाले व याचे त्यांना खूप दुःख होऊ लागले. त्याच वेळी देवीने त्यांना स्वप्नात येऊन दृष्टांत दिला. दृष्टांतात पुणे शहराच्या वायव्य भागात मी आहे असे सांगितले. सांगितलेल्या ठिकाणी उत्खनन करुन पाहिले असता; देवीची एक स्वयंभू मूर्ती दिसली. या मूर्तीवर शेंदूराचा लेप लावून डोळे बसविण्यात आले. तेव्हा पासून नवरात्र उत्सव हे मंदिरात होऊ लागले आणि आज पाहता पाहता लाखो भक्त नवरात्र उत्सवात देवीच्या दर्शनासाठी येत असतात, असं मंदिर विश्वस्त हेमंत अनगळ सांगतात.

 हेही वाचा : टेंभीनाक्याची दुर्गेश्वरी : 46 वर्षांपूर्वी आनंद दिघेंनी 'या' कारणामुळे सुरू केला नवरात्रोत्सव, Video

स्वातंत्र्य चळवळीशी संबंध 

चतु:श्रृंगी हा संस्कृत शब्द असून; पूर्वी याठिकाणी चार डोंगर होते म्हणून या देवीला चतु:श्रृंगी असे नाव मिळाले. त्यावेळी हे मंदिर गावाबाहेर असल्यामुळे भक्तांची संख्या खूप कमी होती. 1961 च्या पानशेतच्या पुरानंतर पुण्याची वाढ होऊ लागली व रस्त्यांची सोय झाली. चतु:श्रृंगी देवी मंदिराच्या येथे गणपतीचे मंदिर देखील आहे. पुण्यामधील रँड या अधिकाऱ्याच्या वधाचा कट देखील या मंदिर परिसरात शिजल्याचे ऐतिहासिक पुरावे आहेत. जेव्हा चाफेकर बंधूंनी रँडची हत्या केली त्यावेळेस त्यांनी लोकमान्य टिळकांना 'गणपती पावला' असे सांकेतिक भाषेत सांगितले होते. यावरील टिळकांचा अग्रलेख देखील प्रसिद्ध आहे.

नवरात्री काळातील पूजा

नवरात्र उत्सवाच्या वेळी अभिषेक, रुद्राभिषेक, महापूजा या ठिकाणी होतात. दररोज सकाळी 10 आणि रात्री 8 वाजता महाआरती केली जाते. नवरात्रीत मंदिर 24 तास भाविकांसाठी दर्शनासाठी खुले राहणार आहे. सुरक्षिततेची उपाययोजना म्हणून भाविकांचा मंदिर परिसरात यात्रेसह विमा काढण्यात आला आहे. पोलीस यंत्रणा, खासगी सुरक्षा रक्षक, मंदिरात बंदुकधारी सुरक्षा रक्षक यांची व्यवस्था करण्यात आलेली आहे.

पत्ता

चतुश्रृंगी देवी गोखलेनगर पुणे, महाराष्ट्र 411016

First published:

Tags: Culture and tradition, Navratri, Pune