जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Video : एकाच गावात तीन वेगवेगळ्या देवीचं रुप, नवस फेडण्याचीही अनोखी प्रथा

Video : एकाच गावात तीन वेगवेगळ्या देवीचं रुप, नवस फेडण्याचीही अनोखी प्रथा

Video : एकाच गावात तीन वेगवेगळ्या देवीचं रुप, नवस फेडण्याचीही अनोखी प्रथा

ना-ना रूपात दर्शन देणाऱ्या दुर्गादेवीचा आकर्षणाचा विषय असतो. वर्धा जिल्ह्यातील विरूळ येथे देखील अशाप्रकारे तीन वेगवेगळ्या रूपातील देवी आहेत.

  • -MIN READ Wardha,Wardha,Maharashtra
  • Last Updated :

    वर्धा, 03 ऑक्टोबर :   यंदा अश्विन शारदीय नवरात्र उत्सव सर्वत्र मोठ्या हर्ष उल्हासाने आणि जल्लोषात साजरा होत आहे. ना-ना रूपात दर्शन देणाऱ्या दुर्गादेवीचा आकर्षणाचा विषय असतो. वर्धा जिल्ह्यातील विरूळ येथे देखील अशाप्रकारे तीन वेगवेगळ्या रूपातील देवी असून तिन्ही देवीचा पुरातन इतिहास असून वेगवेगळ्या आख्यायिका देखील जोडल्या गेल्या आहेत. नक्की कोणती आहेत रूपे आणि काय आहे आख्यायिका पाहूयात.   समस्त विरुळकरांचे कुलदैवत असलेल्या भवानी माता मंदिरात तसेच अंबादेवी व कुरझाई देवी मंदिरात नवरात्रोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. येथील शारदीय नवरात्रोत्सवाला घटस्थापनेपासून सुरुवात झाली आहे. नवरात्रीमध्ये विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. नवसाला पावणारी देवी म्हणून विदर्भातील भाविक येथे दर्शनासाठी येत असतात. भवानी देवी गावातील अगदी शेवटच्या टोकावर भवानी मातेचे भव्य दिव्य मंदिर आहे. येथील मूर्ती दोनशे वर्षापूर्वी कुठून व कशी आली हे अजूनही कोणालाही माहिती नाही. येथे एक छोटेशे मंदिर उभारण्यात आले. नंतर सोनटक्के बंधू यांनी मंदिराचा जीर्णोद्धार करून भव्य मंदिराची उभारणी केली आहे. Video: सर्व मनोकामना पूर्ण करणारी अग्याराम देवी, 2706 अखंड ज्योतींनी उजळले मंदिर पहाडावाली देवी कुरझडीच्या टेकडीवर कुरझाई मातेचे मंदिर उभारण्यात आले आहे. लोकवर्गणीतून या मंदिराची निर्मिती करण्यात आली. या मंदिराला लागूनच समृद्धी महामार्ग गेल्याने या मंदिराच्या सौंदरीकरणात चांगलीच भर पडली आहे. त्यामुळे हे मंदिर रमणीय दिसून येते. मंदिराचे जीर्णोद्धाराचे काम सुरू आहे. येथेही भाविकांची खूप गर्दी असते. Video : कोल्हापूरच्या अंबाबाईचे घ्या नागपुरात दर्शन, घरातच साकारला नयनरम्य देखावा अंबादेवी  गावाच्या मध्यभागी हे मंदिर असून दोनशे वर्षापूर्वीचे पुरातन आहे. पुरातन मंदिराचा जीर्णोद्धार करून लोकवर्गणीतून येथे भव्य मंदिर उभारण्यात आले आहे. सुपारीतून या देवीचे रूप साकार झाल्याची आख्यायिका आहे. वयोवृद्ध मंडळी या देवीचे अनेक अनुभव आजही सांगतात. येथे येणारे भाविक रडत येतात. दर्शन घेऊन हसत जातात. या देवीच्या मंदिरात अनेक चमत्कारिक अनुभव सांगितल्या जातात. मंदिराच्या गाभाऱ्यात असलेले पिंपळाचे दोनशे वर्षापूर्वीचे वृक्ष आज अडीचशे फुटाचे झाले असून ते आजही वाढत आहे. देवीच्या पूजेनंतर या वृक्षाची पुजा केली जाते. नवस फेडणाऱ्यांची गर्दी मातेचे तीन मंदिरे आहेत. येथील नवरात्रोत्सवाला दोनशे वर्षांची परंपरा आहे. हा उत्सव गावात आजही मोठ्या धार्मिक उत्सवात साजरा करतात. उत्सव काळात गावातील वातावरण मंगलमय होते. या उत्सवादरम्यान मंदिरात भाविकांची दर्शनासाठी गर्दी होते. नवसाला पावणाऱ्या भवानी मातेच्या दर्शनासाठी विदर्भातून अनेक भाविक मंडळी विरुळला येतात. मनोकामना पूर्ण झाल्यावर नवस फेडणाऱ्याची गर्दी येथे पाहायला मिळते. व्यवस्थापन समितीने येथे येणाऱ्या भाविकांची चांगली सोय केली आहे. शेवटच्या दिवशी काला, कीर्तन व भव्य महाप्रसादाने येथील कार्यक्रमाची सांगता होणार असल्याचे आयोजकांनी सांगितले आहे.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात