JOIN US
मराठी बातम्या / अध्यात्म / Mithun Sankranti 2023 : आज मिथुन संक्रांतीच्या दिवशी करा हे 5 उपाय, आयुष्यातील सर्व समस्या होतील दूर

Mithun Sankranti 2023 : आज मिथुन संक्रांतीच्या दिवशी करा हे 5 उपाय, आयुष्यातील सर्व समस्या होतील दूर

Mithun Sankranti 2023 : मिथुन संक्रांतीला रज पर्व असेही म्हणतात

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 15 जून: सूर्यदेवाच्या मिथुन राशीत प्रवेशाला मिथुन संक्रांत म्हणतात. 15 जून 2023 रोजी गुरुवारी संध्याकाळी 06.07 मिनिटांनी, सूर्यदेव वृषभ सोडून मिथुन राशीत प्रवेश करेल. या दिवशी 5 महत्त्वाच्या गोष्टी केल्याने जीवनातील सर्व प्रकारच्या समस्या दूर होतात आणि चांगले परिणाम प्राप्त होतात. दीड वर्षांनी केतू बदलणार आपला मार्ग, या राशीच्या लोकांना धनलाभाची शक्यता मिथुन संक्रांतीचे महत्त्व मिथुन संक्रांतीला रज पर्व असेही म्हणतात. ओडिशातील या संक्रांतीच्या दिवशी सूर्यदेवाकडे चांगल्या पीकपाण्यासाठी पावसाची विनंती करतात, तर पूर्व आणि ईशान्य भारतात मिथुन संक्रांती ही पृथ्वी मातेचा वार्षिक मासिक धर्म म्हणून साजरा केला जातो, ज्याला अंबुबाची मेळा असेही म्हणतात. या दिवशी पाटा-वरवट्याची पूजा केल्याने धन आणि पृथ्वीमातेचा आशीर्वाद मिळतो. या दिवसापासून सर्व नक्षत्रांमध्ये राशींची दिशाही बदलते. हा बदल महत्त्वाचा मानला जातो. त्यानंतरच पावसाळ्याची औपचारिक सुरुवात होते. मिथुन संक्रांतीचे उपाय सूर्यपूजा या दिवशी सकाळी स्नान वगैरे करून सूर्याला अर्घ्य द्यावे. यासोबतच सूर्यदेवाची पूजा आणि आरती करावी. या कार्याने जिथे सूर्यदेवाची कृपा होते, आरोग्य चांगले राहते. समाजात मान-सन्मान वाढतो आणि उच्च दर्जा प्राप्त होतो. आठवड्यातील दोन दिवस अगरबत्ती लावण्यास आहेत वर्ज्य, काय आहे कारण दान या दिवशी गूळ, तूप, गहू आणि तांबे विशेषतः गरिबांना दान केल्याने करिअर आणि नोकरीमध्ये लाभ होतो. यासोबतच या दिवशी मूग, पालक आणि हिरवे कपडे दान करणेही खूप शुभ आणि फलदायी मानले जाते. मीठ सोडून द्या या दिवशी सूर्यास्तापर्यंत मीठ खाऊ नये. असे केल्याने सर्व प्रकारचे संकट दूर होऊन सूर्यदेवाची कृपा प्राप्त होते आणि व्यवसायात लाभ होतो. सरकारी नोकरी असेल तर त्याचे सकारात्मक परिणाम दिसून येतात. पितृ तर्पण या दिवशी गंगेत स्नान केल्यावर, नदीच्या तीरावर पितरांना अर्पण आणि दान केल्यावर पितृदेव प्रसन्न होऊन त्यांना आशीर्वाद देतात आणि त्यांच्या मोक्षाचा मार्ग खुला करतात. यामुळे पितृदोषही दूर होतो. Chanakya Niti : जन्माच्या आधीपासून ठरलेल्या आहेत या 5 गोष्टी, असा करू शकता बदल गंगेत स्नान असे मानले जाते की या विशेष दिवशी गंगा नदीत स्नान करणार्‍यांची पूर्वीची पापे मुक्त होतात. जर तुम्हाला गंगेत स्नान करता येत नसेल तर घरातील शुद्ध पाण्यात गंगाजल मिसळून स्नान करावे आणि नंतर सूर्य चालिसाचे पठण करावे. (सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या