मुंबई, 14 जून: दरवर्षी, असे अनेक ज्योतिषीय संक्रमण असतात जे प्रत्येक राशीवर काही ना काही प्रभाव टाकतात. या वर्षी केतूची राशी बदलत आहे. ज्योतिष शास्त्रानुसार हे संक्रमण अनेक राशींसाठी अत्यंत महत्त्वाचे आणि फायदेशीर ठरेल. यामुळे काही जणांसाठी काळ पूर्णपणे बदलून जाणार आहे. ऑक्टोबर 2023 मध्ये केतू संक्रमण करेल. केतूचे संक्रमण 30 ऑक्टोबर 2023 रोजी होईल. जाणून घ्या कोणत्या राशीच्या लोकांना आठवड्यातील दोन दिवस अगरबत्ती लावण्यास आहेत वर्ज्य, काय आहे कारण मिळणार फायदे आणि अशुभ प्रभाव टाळण्यासाठी उपाय- केतू संक्रमणाचा या राशींवर प्रभाव ज्योतिषांच्या मते सिंह, वृषभ आणि धनु राशीच्या लोकांना केतूच्या प्रभावाचा सर्वाधिक फायदा होईल. या राशीचे लोक भरपूर पैसा मिळवण्यात यशस्वी होतील. या वर्षात त्यांनी जे काही केले त्यात यश मिळण्याची दाट शक्यता आहे आणि त्यांना कामात प्रमोशनदेखील मिळू शकते. या राशीच्या लोकांना लांबच्या प्रवासावर जाण्याची संधीदेखील मिळू शकते, ज्यामुळे त्यांना भविष्यात अधिक फायदा होईल. एखादे काम दीर्घकाळ रखडले असेल तर शेवटी त्यांना गती मिळेल. नातेसंबंधांच्या आघाडीवर, असे लोक त्यांच्या प्रियजनांसोबत चांगला वेळ घालवतात. तथापि, या राशीच्या लोकांनी रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक करणे किंवा नवीन व्यवसाय सुरू करणे टाळावे. मेष, मिथुन आणि मकर राशीसाठी केतू संक्रमण अशुभ राहील. या राशींसाठी धनहानी होईल आणि काही अपयशही या वर्षी दिसेल. Shani Vakri : शनीच्या उलट्या चालीचा या 5 राशींना होणार सर्वाधिक फायदा केतु ग्रहाच्या अशुभ प्रभावासाठी उपाय 1. भगवान भैरवाची आराधना करा आणि भैरव चालिसाचा दररोज पाठ करा. 2. कुत्र्यांना खायला द्या. 3. ॐ श्रां श्रीं श्रौं स: केतवे नमः चा जप करा. हा केतूचा बीज मंत्र आहे. जप करताना प्रार्थना करा की, ग्रह तुमच्या जीवनातील सर्व अडथळे दूर करतील. (सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.