JOIN US
मराठी बातम्या / अध्यात्म / Maha Shivratri: महादेवाच्या गळ्यात का आहे नर ​​मुंडमाला? जाणून घ्या पौराणिक कथा

Maha Shivratri: महादेवाच्या गळ्यात का आहे नर ​​मुंडमाला? जाणून घ्या पौराणिक कथा

Maha Shivratri 2023: भगवान शिव आपल्या अंगावर अही, व्याळ आणि भुंजग धारण करतात

जाहिरात

महादेवाच्या गळ्यात का आहे नर ​​मुंडमाला

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 17 फेब्रुवारी:  हिंदू कॅलेंडरनुसार या वर्षी महाशिवरात्री 18 फेब्रुवारीला येत आहे. भगवान शिव आपल्या अंगावर अही, व्याळ आणि भुंजग धारण करतात, अंगावर अंत्यसंस्काराची भस्म लावलेली असते, गळ्यात नरमुंड माळा आणि कमरेला वाघाची कातडी गुंडाळलेली असते, हे सर्व बाह्यतः अशुभ पोशाख आहेत. असे असतानाही महादेव हे मंगलधाम आहे. म्हणून सर्व देवतांना आशीर्वाद देणारे आणि सर्व प्राणिमात्रांचे कल्याण करणारे महादेव म्हणजे शिवच आहेत. शास्त्रानुसार भगवान शिव आणि देवी पार्वतीचा विवाह फाल्गुन कृष्ण चतुर्दशीला झाला होता. देवी पार्वती गत जन्मी महादेवाच्या पत्नी सती होत्या. एकदा नारद मुनींच्या सांगण्यावरून सतीने भगवान शंकराच्या गळ्यातील नर मुंडमालांचे रहस्य विचारले. पौराणिक मान्यतेनुसार जाणून घेऊया या मुंडमालाचे रहस्य! गणपती व कार्तिकेय व्यतिरिक्त महादेवाला होती 8 मुले, जाणून घ्या रंजक जन्मकथा पौराणिक कथा शिवमहापुराणानुसार, एकदा भगवान विष्णू म्हणाले- हे शिव! भूतकाळात जन्मलेल्या ब्रह्मांच्या अस्थींची माला तुमच्या कंठात सजवली जात आहे. विष्णूजींच्या या म्हणण्यावर राहूनेही त्यांना नमस्कार केला आणि त्यांच्या मस्तकावर स्थिरावला. तेव्हा चंद्र घाबरला आणि त्याने अमृत स्राव केला. भगवान शंकरांनी ते सर्व पाहून देवकार्य सिद्धीसाठी राहूच्या मस्तकाची माळा घातली. शतरुद्र संहितेत उल्लेख आहे की, महादेवाने नरसिंहाचे मुख या मुंडमालाचा सुमेरू बनवला होता. पुराणानुसार, ही मुंडमाला भगवान शिव आणि सती यांच्या अखंड प्रेमाचे प्रतीक आहे. देवर्षी नारदांच्या सांगण्यावरून देवी सतीने महादेवाला त्याचे रहस्य विचारले होते. खूप समजावून सांगूनही सतीने ऐकले नाही, तेव्हा महादेवाने त्यांना सांगितले की या मुंडमाळातील सर्व मुंड तुमचे आहेत. शिवजी म्हणाले हा तुमचा 108 वा जन्म आहे. यापूर्वीही तुम्ही 107 वेळा जन्म घेऊन शरीर सोडले आहे. हे मस्तक फक्त त्या जन्मांचे प्रतीक आहे. मुंडमाळा धारण करण्याचे रहस्य जाणून सतीने शिवाला विचारले की, मी माझ्या शरीराचा वारंवार त्याग करते, पण तुम्ही त्याग करत नाहीत, तेव्हा महादेवाने त्यांना सांगितले की, मला अमरकथेचे ज्ञान आहे, म्हणून मला वारंवार शरीराचा त्याग करावा लागत नाही. सतीनेही महादेवाकडून अमरकथा ऐकण्याची इच्छा प्रकट केली. असे मानतात की, जेव्हा महादेव सतीला कथा ऐकवत होते तेव्हा सती पूर्ण कथा ऐकू शकल्या नाहीत, मध्येच त्यांना झोप लागली. यामुळे त्यांना राजा दक्षाच्या यज्ञात उडी मारून आत्मदाह करावा लागला.

माता पार्वतीला प्राप्त झाले अमरत्व देवी सतीच्या आत्मदहनानंतर भगवान शंकराने देवाच्या शरीराच्या अवयवांतून 51 पीठांची निर्मिती केली, परंतु शिवाने सतीचे मस्तक आपल्या माळेमध्ये गुंफले. अशा प्रकारे महादेवाने 108 मस्तकांची माळा धारण केली. तथापि, नंतर सतीचा पुढील जन्म पार्वतीच्या रूपात झाला. या जन्मात माता पार्वतीला अमरत्व प्राप्त झाले आणि त्यानंतर देवीला शरीर सोडावे लागले नाही. (सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या